अफगाणिस्तानचा खरा गुन्हेगार कोण? जो बायडेन कि अशरफ घनी?

२० वर्षांत अमेरिकेने स्वतःच्या शेकडो जवानांचे जीव गमावले आहेत, ती चूक मी होऊ देणार नाही, अफगाणिस्तान ही आता संयुक्त राष्ट्र संघाचीही जबाबदारी आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन देशाला संबोधित करताना म्हणाले.  

अमेरिकाने सैन्य माघारी बोलावताच दबा धरून बसलेल्या तालिबान्यांनी अवघ्या २ महिन्यांत अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला आहे. त्यावर अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मौन सोडले. त्यावेळी त्यांनी सर्व खापर अफगाणिस्तानातून पळालेले राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी  यांच्यावर फोडले आहे. त्यामुळे अफगाणिस्तानाच्या या स्थितीला नक्की कोण जबाबदार आहे? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन कि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी? असा प्रश्न आता अवघ्या जगाला पडला आहे.

२० वर्षांतला मी ५वा राष्ट्राध्यक्ष, मी चूक करणार नाही!

अफगाणिस्तानातून तालिबान राजवट संपवल्यानंतरचा मी ५वा राष्ट्रपती आहे. अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्याचा अमेरिकेने बदल घेतला, मात्र त्यानंतर अफगाणिस्तानला उभे करण्यासाठी सर्व प्रयत्न केले. त्यांच्या सैन्यातील अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरवली, प्रशिक्षण दिले, त्यांना पगार दिले, पण शेवटी काय झाले, तालिबान्यांच्या विरोधात अफगाण सैन्य लढलेच नाही, राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी पळून गेले. यात अमेरिकेची चूक नाही. २० वर्षांत अमेरिकेने स्वतःच्या शेकडो जवानांचे जीव गमावले आहेत, ती चूक मी होऊ देणार नाही, म्हणून तरीही दहशतवादाच्या विरोधातील लढाई आमची सुरूच राहणार आहे. मात्र अफगाणिस्तानात ही आता संयुक्त राष्ट्र संघाचीही जबाबदारी आहे. आम्ही अफगाणिस्तानातील शरणार्थीसाठी ५०० मिलीयन डॉलरची तरतूद करत आहोत, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी देशाला संबोधित करताना म्हणाले.

(हेही वाचा : अफगाणिस्तान का बनतोय महासत्तांसाठी स्मशानभूमी? जाणून घ्या…)

अशरफ घनी आहेत तरी कोण? 

१९४९ साली अफगाणिस्तानात जन्मलेले अशरफ घनी यांचे माध्यमिक शिक्षण काबूलमध्येच झाले, पुढे अमेरिकन विद्यापीठातून त्यांनी १९७३ साली पहिली पदवी घेतली. परदेशात शिकलेले अशरफ घनी यांनी पॉलिटिकल सायन्स या विषयात दुसरी पदवी ग्रहण केली. त्यानंतर त्यांनी मानवशास्त्र विषयातही पदवी ग्रहण केली. उच्च शिक्षित अशरफ घनी यांनी जागतिक बँकेत काम करून जागतिक पातळीवरील विकासावर अभ्यास केला. २००१ साली अमेरिकेने अफगाणिस्तानातून तालिबानी राजवट संपुष्टात आणली. त्यानंतर अशरफ घनी अफगाणिस्तानात परतले. त्यांच्याकडील ज्ञानाचा त्यांनी अफगाणिस्तानच्या उभारणीसाठी योगदान देणे सुरु केले. त्यासाठी ते त्यावेळीचे राष्ट्रपती करझई यांचे सल्लागार बनले. डिसेंबर २००४ साली ते अर्थमंत्री बनले. त्यानंतर २२ सप्टेंबर २०१४ रोजी अशरफ घनी हे अफगाणिस्तानचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले. असे असले तरी उच्च शिक्षा विभूषित अशरफ घनी नेतृत्वात मात्र नापास ठरले, तुटपुंज्या तालिबानी दहशतवाद्यांच्या विरोधात न लढता देश सोडून पळून गेले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here