खोटं पसरवणारे, सत्य ऐकू शकत नाहीत. या लोकांना सत्य पचवता येत नाही. यामुळे ते सभागृह सोडून पळून जात आहेत. मी माझ्या कर्तव्याशी संलग्न आहे. मला प्रत्येक क्षणाचा हिशोब देशवासियांना द्यायचा आहे. तिसऱ्यांदा संधी मिळणे ऐतिहासिक आहे. खासदारांनी सभागृहाची प्रतिष्ठा वाढवली आहे. तसेच, गेल्या अडीच दिवसांत सुमारे ७० खासदारांनी या चर्चेत भाग घेतला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला तुम्ही दिलेल्या योगदानाबद्दल मी तुम्हा सर्व खासदारांचे आभार मानतो, असे नरेंद्र मोदी संसदेत ३ जुलै या दिवशी बोलतांना म्हणाले.
(हेही वाचा – Wimbledon 2024 : माजी इंग्लिश चॅम्पियन अँडी मरेची विम्बल्डन एकेरीतून माघार)
जाणीवपूर्वक कलंकित करण्याचा प्रयत्न
विरोधकांनी सभात्याग केल्यावर त्यांच्यावर हल्लाबोल करताना नरेंद्र मोदी म्हणाले, “भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील आपल्या संसदीय लोकशाही प्रवासात अनेक दशकांनंतर देशातील जनतेने एका सरकारला सलग तिसऱ्यांदा सेवेची संधी दिली आहे. ६० वर्षांनंतर असे झाले आहे की, सरकार १० वर्षांपर्यंत सत्तेत राहिल्यानंतर पुन्हा परतले आहे. ही काही सामान्य गोष्ट नाही. जनतेने दिलेल्या या निर्णयाला काही लोकांनी जाणीवपूर्वक कलंकित करण्याचा प्रयत्न केला. मला काही काँग्रेस सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानायचे आहेत. निकाल आल्यापासून एका सहकाऱ्याकडून (जरी त्यांचा पक्ष त्यांना पाठिंबा देत नसला तरी) एक तृतीयांश सरकार स्थापन होईल, असे वारंवार सांगितले जात होते. १० वर्षे उलटून गेली आणि अजून २० बाकी आहेत यापेक्षा मोठे सत्य काय असू शकते. एक तृतीयांश झाले, अजून दोन तृतीयांश बाकी आहेत. त्यामुळे त्यांच्या या भविष्यवाणीसाठी त्यांच्या तोंडात तूप आणि साखर.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्हाला मेहनत करायची आहे. येत्या पाच वर्षांत मूलभूत सुविधांच्या सॅच्युरेशनवर लक्ष केंद्रित केले जाईल. पुढील पाच वर्षे गरिबीविरुद्ध निर्णायक लढा देणार आहे. गरिबीविरुद्धची लढाई आपण जिंकू. मी माझ्या १० वर्षांच्या अनुभवावरून बोलत आहे की, जेव्हा देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल तेव्हा त्याचा परिणाम जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर होईल. या काळात तुम्हाला विस्ताराच्या अनेक संधी मिळतील.
हेही पहा –