BJP चा राष्ट्रीय अध्यक्ष ६ एप्रिलला जाहीर होणार; ‘ही’ चार नावं चर्चेत

125
BJP चा राष्ट्रीय अध्यक्ष ६ एप्रिलला जाहीर होणार; ‘ही’ चार नावं चर्चेत
BJP चा राष्ट्रीय अध्यक्ष ६ एप्रिलला जाहीर होणार; ‘ही’ चार नावं चर्चेत

भाजपाच्या (BJP) राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. भाजपाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा (J. P. Nadda) यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. तसेच नड्डा (J. P. Nadda) यांचा कार्यकाळही संपला आहे. त्यामुळे भाजपाचा नवीन अध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

( हेही वाचा : Kisan Credit Card ची मर्यादा 5 लाखांवर ; आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये नवा नियम लागू होणार !

दरम्यान शिवराज सिंग चौहान (Shivraj Singh Chouhan), भुपेंद्र यादव (Bhupender Yadav) , मनोहरलाल खट्टर (Manohar Lal Khattar) आणि धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) ही चार नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. त्यात दि. ६ एप्रिलला भाजपाचा स्थापना दिवस आहे. त्यामुळे या दिवशी नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.

२०१४ ला देशात भाजपाची (BJP) सत्ता आल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शाह (Amit Shah) विराजमान झाले. तर २०१९ ला जे.पी.नड्डा (J. P. Nadda) हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यांच्या कार्यकाळात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. आता त्यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे लवकरच भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर होईल.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं जाईल अशाही चर्चा रंगल्या होत्या. मात्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपण महाराष्ट्रातच राहणार असं सांगितलं होतं. दरम्यान निवडणुकीत भाजपासह महायुतीला २३७ जागा मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. साधारण वर्षभरापूर्वी विनोद तावडेंचंही (Vinod Tawde) नाव चर्चेत होतं. पण आता नवे चार चेहरे चर्चेत आले आहेत. त्यापैकी कुणाला राष्ट्रीय अध्यक्षपद मिळणार की भाजपा धक्कातंत्राचा वापर करुन अनेपक्षित नाव समोर आणणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. (J. P. Nadda)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.