- खास प्रतिनिधी
विधानसभा निवडणूक झाली. निकाल लागले. मुख्यमंत्री पदाचा तिढाही जवळपास सुटला. आता मंत्रीपद आणि पालकमंत्री पदासाठी आमदारांचे लॉबिंग सुरु झाले आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी २६ नोव्हेंबर २०२४ या दिवशी सकाळी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांचा मंत्रीमंडळात समावेश होण्याची शक्यता बळावली आहे. यामुळे विधान परिषदेतील आमदार पंकजा मुंडे धनंजय यांच्या मंत्री पदावर गंडांतर येणार, अशी शक्यता शक्यता निर्माण झाली आहे.
(हेही वाचा – Unified Insurance : एकच कंपनी देणार सर्व प्रकारचे विमा संरक्षण, विमा क्षेत्रातील मोठा बदल)
दोन पराभवानंतर पुनर्वसन
२०१९ मध्ये धनंजय विरुद्ध पंकजा विधानसभेला एकमेकांसमोर उभे होते. त्यात धनंजय यांनी पंकजा यांना ३०,००० हून अधिक मतांनी पराभूत केले. त्यानंतर २०२४ मध्ये, म्हणजेच सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीड (Beed) लोकसभा मतदारसंघातून पंकजा यांना भाजपाने उमेदवारी दिली. त्यातही त्यांचा पराभव झाला. त्यामुळे पंकजा यांना जुलै २०२४ मध्ये विधान परिषदेवर पक्षाने संधी देत त्यांचे पुनर्वसन केले. मात्र त्यांचे समर्थक आणि पक्षातील ज्येष्ठता पाहता पंकजा यांना मंत्रीपद देण्यासाठीचा अंतर्गत दबाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(हेही वाचा – Pan Card 2.0 : केंद्र सरकारचं नवीन पॅन २.० कसं आहे? त्याचा उपयोग काय?)
राजकीय वजन वाढले
सदया अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष महायुतीत असून अडीच वर्षे महाविकास आघाडी आणि दीड वर्षे महायुती सरकारच्या काळात धनंजय हे गेली काही वर्षे मंत्री पदावर आहेत. त्यामुळे तुलनेने धनंजय यांचे राजकीय वजन वाढले. परिणामी, बीड (Beed) जिल्ह्याचे पालकत्व धनंजय मुंडे यांच्याकडे जाण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community