शिंदे, फडणवीस, पवार की ठाकरे… Maharashtra चा मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती कुणाला?

25
शिंदे, फडणवीस, पवार की ठाकरे... Maharashtra चा मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती कुणाला?
शिंदे, फडणवीस, पवार की ठाकरे... Maharashtra चा मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती कुणाला?

महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभेच्या २८८ जागांसाठी दि. २० नोव्हेंबरला मतदान झाले. त्यानंतर सर्वांच्या नजरा दि. २३ नोव्हेंबरला येणाऱ्या निकालाकडे लागलेले आहेत. अशातच एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली. ज्यातील अनेक एक्झिट पोलमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळवण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र यासगळ्यात राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. त्याचवेळी महायुती आणि मविआने आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडणुक निकालानंतर जाहीर करू, अशी भुमिका घेतली आहे.

( हेही वाचा : Baba Navnath यांची समाधी दर्गा असल्याचा कट्टरपंथींचा दावा; हिंदूंवर दगडफेक

दरम्यान पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलनुसार(People’s Pulse exit polls), सर्वाधिक पसंतीचा मुख्यमंत्री कोण हे समोर आले आहे. त्यात ३५.८ टक्के लोकांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पहिल्या क्रमांकासाठी पसंती दिली आहे. दुसऱ्या क्रमांकावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) असून त्यांना २१.७ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) ११.७ टक्के, अजित पवार यांना २.३ टक्के आणि नाना पटोले यांना १.३ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तसेच इतर या श्रेणीतील चेहऱ्याला २७. २ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वाधिक पसंतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याची चर्चा आहे. (Maharashtra)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.