BJP : भाजप महाराष्ट्राचा प्रभारी कुणाला बनविणार? कैलाश विजयवर्गीय यांच्या नावाची चर्चा

सध्या महाराष्ट्राचा कोणीही प्रभारी नाही. आगामी नोव्हेंबरमध्ये छत्तीसगढमध्ये निवडणुका होणार आहेत, पण तेथेही भाजपचा कोणी प्रभारी नाही. (हेही वाचा MVA : शरद पवार – उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मविआची बैठक; ‘या’ मुद्द्यावर झाली

109

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी उद्या गुरूवार, 24 आॅगस्ट रोजी पक्षाच्या सरचिटणीसांची एक महत्वाची बैठक बोलाविली आहे. यात महाराष्ट्राचा प्रभारी पदाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता  आहे.

आगामी काळातील विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक लक्षात घेता भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात मॅराथॉन बैठकांचे सत्र सुरू आहे. उद्या गुरूवारी सरचिटणीसांची बैठक होत आहे. यात नवनियुक्त राष्ट्रीय सरचिटणीस संजय बेदी आणि राधा मोहनदास यांना कोणती जबाबदारी द्यायची याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. याशिवाय सी.टी.रवी यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदावरून हटविण्यात आले आहे. यामुळे सध्या महाराष्ट्राचा कोणीही प्रभारी नाही. आगामी नोव्हेंबरमध्ये छत्तीसगढमध्ये निवडणुका होणार आहेत, पण तेथेही भाजपचा कोणी प्रभारी नाही.

(हेही वाचा MVA : शरद पवार – उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मविआची बैठक; ‘या’ मुद्द्यावर झाली चर्चा)

भाजपातील सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये भाजपने चार भव्य निवडणूक मिरवणुका काढण्याचा निर्णय घेतला आहे. उद्याच्या बैठकीत त्यावर चर्चा होईल. शिवाय, राष्ट्रीय सरचिटणीसांच्या कामकाजात काही फेरबदल होण्याची श्क्यता आहे. दरम्यान, सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांना महाराष्ट्राचे प्रभारी बनविले जाणार असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कैलाश विजयवर्गीय हे घनिष्ट मित्र आहेत, हे येथे उल्लेखनीय आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.