शिंदे-भाजप मंत्रिमंडळात कोणाला कोणते खाते?

130

शिंदे-भाजप सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आता या नव्या युती सरकारवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे या सरकारच्या मंत्रीमंडळात कोणाला स्थान मिळणार या चर्चांना आता सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रिमंडळातील खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

कोणाला कोणते खाते?

11 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात होणा-या सुनावणीनंतर नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मंत्रिमंडळात नेत्यांना संधी देताना अनुभवाप्रमाणेच कार्याचा देखील विचार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि सामान्य प्रशासन खाते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असू शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तसेच अर्थ खात्याची जबाबदारी देखील देवेंद्र फडणवीस यांच्याचकडे असू शकते, असे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः मुख्यमंत्री-पवार यांची झाली भेट? एकनाथ शिंदेंनीच केले स्पष्ट)

भाजपला जास्त मंत्रीपदे?

शिंदे गटातील माजी मंत्र्यांपैकी काही जणांना नव्या मंत्रिमंडळात नाकारले जाऊ शकते, तसेच भाजपकडून देखील काही मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान नाकारले जाऊ शकते, अशी माहिती मिळत आहे. शिंदे गटाला 15 ते 17 तर भाजपला 25 ते 27 मंत्रीपदे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळात भाजपकडे जास्त मंत्रीपदे राहू शकतात असे सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.