तुमच्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार?… वाचा यादी

119

शिवसेना-भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असला, तरी अद्याप पालकमंत्र्यांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी आपल्या जिल्ह्यात ध्वजारोहण कोण करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. शिंदे सरकारने त्यावर तोडगा काढला असून, मंत्र्यांना ध्वजवंदनासाठी जिल्हे वाटून दिले आहेत.

( हेही वाचा : राज्यात NDRF आणि SDRF च्या १८ तुकड्या तैनात)

बहुतांश मंत्र्यांच्या वाट्याला त्यांचेच जिल्हे आले आहेत. मंत्री नसतील अशा ठिकाणी विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी झेंडावंदन करतील. मात्र, संबंधित मंत्र्यांकडेच या जिल्ह्यांचे पालकमंत्री पद राहील, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, चंद्रकांत पाटील पुणे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण ध्वजारोहण करणार आहेत.

कोण कुठे ध्वजारोहण करणार?

१) देवेंद्र फडणवीस – नागपूर
२) सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर
३) चंद्रकांत पाटील – पुणे
४) राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर
५) गिरीश महाजन – नाशिक
६) दादा भुसे – धुळे
७) गुलाबराव पाटील – जळगाव
८) रवींद्र चव्हाण-ठाणे
९) मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
१०) दीपक केसरकर – सिंधुदुर्ग
११) उदय सामंत – रत्नागिरी
१२) अतुल सावे – परभणी
१३) संदिपान भुमरे – औरंगाबाद
१४) सुरेश खाडे – सांगली
१५) विजयकुमार गावित – नंदुरबार
१६) तानाजी सावंत – उस्मानाबाद
१७) शंभूराज देसाई – सातारा
१८)अब्दुल सत्तार – जालना
१९) संजय राठोड – यवतमाळ

उर्वरित जिल्ह्यांचे काय?

अमरावतीमध्ये विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे ध्वजारोहण करतील. त्याशिवाय कोल्हापूर, रायगड, बीड, हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अकोला, सोलापूर, लातूर, वाशिम, बुलडाणा, पालघर, नांदेड या जिल्ह्यांत संबंधित जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.