उत्तर प्रदेश कोणी जिंकवले, मोदींनी की योगींनी? गडकरी काय म्हणतात… 

124

अलिकडेच ५ राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये ४ राज्यांमध्ये भाजपाची एक हाती सत्ता आली. त्यातील उत्तर प्रदेशच्या निकालाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्याचे विश्लेषण करताना उत्तर प्रदेशची निवडणूक कोणी जिंकवली, मोदींनी की योगींनी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेले उत्तर चांगलेच चर्चेत आले आहे.

उत्तर प्रदेशमधील विजय योगींच्या लोकप्रियतेचा आहे की मोदींच्या मार्गदर्शनाचा आहे? असा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर नितीन गडकरी म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकारचे काम आणि उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने केलेल्या कामाचा परिणाम म्हणजे भाजपाला एवढा मोठा विजय मिळाला आहे. असे उत्तर देत गडकरी यांनी समातोल साधला आहे.

(हेही वाचा लतादीदी गायन सोडणार होत्या, तेव्हा वीर सावरकर यांनी दिला होता ‘हा’ सल्ला!)

उत्तर प्रदेशातील गुंडांवर कारवाई केल्याचा फायदा

नितीन गडकरी म्हणाले की, उत्तर भारतात कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अनेक समस्या आहेत. योगींनी धाडस दाखवून गुंडांवर कारवाई केली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे राज्य प्रस्थापित झाले. लोकशाहीत कायद्याचा आदर आणि भीती नसेल, तर ती चांगली गोष्ट नाही. योगींनी कायदा आणि सुव्यवस्थेसाठी घेतलेल्या भूमिकेमुळे माता-भगिनींमध्ये विश्वास निर्माण झाला आहे.

केंद्र सरकारच्या कामांचा उपयोग

‘जात, धर्म, समुदायाच्या वर जात लोकांचा कायद्यावर विश्वास आहे. सरकारने केलेल्या कामावर जनतेने विश्वास दाखवला. गंगा शुद्धीकरण, जलमार्ग, राष्ट्रीय मार्ग आदी कामे करून लोकांना दिलासा मिळाला, त्याचा फायदा सरकारला निवडणुकीत झाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.