शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुकरवारी झालेल्या जिल्हाप्रमुख व संपर्कप्रमुखांच्या बैठकीत स्पष्ट भूमिका मांडत पक्षातील बंडखोरांना कडक इशारा दिला. “तुमच्याच पक्षातील काही लोक जर सांगत असतील की पक्षात काही राहिले नाही, तिकडे जा वगैरे, तर त्यांच्या नंबर मला द्या. मी त्यांचा समाचार घेतो,” असे ठाकरेंनी सांगितले. (Uddhav Thackeray)
(हेही वाचा- Commercial Slum : झोपड्यांच्या प्रत्येक माळ्यांचा कमर्शियल वापर, तेवढा महापालिका आकारणार मालमत्ता कर?)
यावेळी ठाकरे अॅक्शन मोडमध्ये दिसून आले. “कोणाला पक्ष सोडून जायचे असेल त्यांनी जावे. मी निष्ठावंतांना सोबत घेऊन पक्ष पुढे नेईन,” असे ठामपणे सांगत त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. (Uddhav Thackeray)
बैठकीत त्यांनी जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांना पक्षसंघटन बळकट करण्याच्या सूचना दिल्या. “स्थानिक पातळीवर नेतृत्व तयार करा, पक्ष वाढवा, आणि कार्यकर्त्यांना विश्वास द्या,” असे आवाहन त्यांनी केले. (Uddhav Thackeray)
शिवसेना उबाठातील अंतर्गत अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी घेतलेली ही भूमिका राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरत आहे. “मी निष्ठावंतांसोबतच राहीन,” या त्यांच्या विधानाने पक्षातील बंडखोर नेत्यांना थेट संदेश दिला आहे. (Uddhav Thackeray)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community