Veer Savarkar : वीर सावरकरांवर टीका करणाऱ्यांपैकी कोणाच्या पूर्वजांना फाशी झाली? संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर

173

देशातील काही लोक स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करतात. पण या टीकाकारांच्या कोणत्या पूर्वजांना फाशी झाली होती? असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केला. नागपुरातील चिटणवीस सेंटर येथे आयोजित देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

सेल्युलर जेलमध्ये यातना सहन करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे की, माणूस कठीण प्रसंगाला किती संयमाने सामोरे जाऊ शकतो हे माणसाच्या संस्कार आणि आठवणींवर अवलंबून असते. सावरकरांचे हे विचार पत्रकारितेत काम करणाऱ्यांसाठी अतिशय योग्य आहेत. आजकाल आपल्या देशात काही लोक सावरकरांवर टीका करतात. या टीका करणाऱ्यांच्या पूर्वजांनी कोणते सर्वोच्च बलिदान दिले किंवा त्यांना फाशी देण्यात आली? असा सवाल आंबेकर यांनी विचारला.

सध्याच्या काळात मीडिया आणि सोशल मीडिया हे माहितीच्या महासागरासारखे आहेत. या महासागरात आपण आपली बोट कशी चालवतो यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. चांगले माध्यम हवे असेल तर सोशल मीडियावर जबाबदारीने वागले पाहिजे, असे आवाहन आंबेकर यांनी केले.

(हेही वाचा Hindu : हिंदू मुलाशी लग्न केल्याने मुस्लिम मुलीला धमक्या; सीएम योगी आणि बागेश्वर बाबांना केले आवाहन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.