राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंबंधीच्या वादावर निर्णय होईपर्यंत हे चिन्ह आमच्याकडेच द्या, ते गोठवू नका अशी मागणी शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे (Election Commission) केली. पक्षाचे सर्व अधिकार शरद पवार यांच्याकडे आहेत, त्यामुळे अजित पवार हे पक्षावर दावा करू शकत नाही. तसेच पक्षातील ५८८ जणांच्या कार्यकारिणी सदस्यांनी शरद पवार यांची निवड केली होती, असा युक्तीवाद शरद पवार गटाने केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर शुक्रवारी, ६ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगामध्ये (Election Commission) सुनावणी सुरू असून राष्ट्रवादीचे चिन्ह गोठवले जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीवर अजित पवार गट दावा करू शकत नाही, असे सांगत शरद पवार गटाने अजित पवार यांच्यासह ९ जणांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आता याबाबतची निवडणूक आयोगातील पहिल्या दिवसाची सुनावणी अखेर संपली आहे. आता पुढची सुनावणी सोमवारी, ९ ऑक्टोबरला संध्याकाळी चार वाजता होणार आहे, अशी माहिती वकील मानिंदर सिंह यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community