अमृता फडणवीस यांनी आतापर्यंत राजकारणावर केलेले प्रत्येक ट्विट बातमी बनत असते, मग ते त्यांचे पती देवेंद्र फडणवीस हे सत्तेत असो अथवा विरोधी पक्षात असो. काही ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात वाद निर्माण झाले होते. अशा वेळी अमृता फडणवीस यांच्याकडेही अन्य राजकीय नेत्यांप्रमाणे सोशल मीडिया सांभाळणारी टीम असेल, असा समाज सर्वसामान्यांचा होणे साहजिक आहे. मात्र त्याचा खुलासा अमृता फडणवीस यांनी एका मराठी वृत्त वहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला आहे.
राजकीय ट्विटमुळे नुकसान होते
आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपण आपल्या दिवसाभरातील व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून एखादे ट्विट करत असतो. तो माझा विचार असतो. मी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात घडणाऱ्याघडामोडींचा कायम विचार करत असते, त्यानुसार ट्विट करायचे म्हटले तर मला दिवसाला १०० ट्विट करावे लागतील, पण मी केवळ एखाद-दुसरे ट्विट करते. माझे ट्विटर अकाउंट मी स्वतःच सांभाळते, दुसरे कुणी सांभाळत नाही, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. तरीही मी जास्त राजकीय विषयावर व्यक्त होत नाही, कारण हे मला समजले आहे कि यात माझे आणि देवेंद्र फडणवीस यांचेही नुकसान होते. लोक म्हणतात की, देवेंद्र फडणवीस माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी झडतात, पण ते तसे नाही मी माझी व्यक्त होत असते, असे अमृता फडणवीस म्हणाले.
Join Our WhatsApp Community