उत्तर प्रदेशात BJP का हरली? भाजपा टास्क फोर्सच्या अहवालात आले समोर

208
उत्तर प्रदेशात BJP का हरली? भाजपा टास्क फोर्सच्या अहवालात आले समोर

लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेश मध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या कमी प्रतिसादामुळे अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते. अगदी भाजपाने देखील उत्तर प्रदेशातील निवडणूकीच्या निकालाला फारच गंभीरपणे घेतले होते. पराभवाची कारण मिमांसा करण्यासाठी टास्क फोर्स तयार करण्यात आला होता. त्या टास्क फोर्सचा अहवाल बुधवारी (३ जुलै) आला असून अंतर्गत कलह, प्रशासनाचा असहकार तसेच स्थानिक नेत्यांच्या वादामुळे पक्षाला पराभव पत्कारावा लागला असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. (BJP)

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपाला अनपेक्षितपणे मोठा धक्का बसला. मागील निवडणुकीत भाजपाला ६२ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत हा आकडा जवळपास निम्म्याने खाली आला. या पराभवाची कारणे शोधताना भाजपाच्या टास्क फोर्सने दोन मुद्यांवर सर्वाधिक जोर दिला आहे. भाजपाने नियुक्त केलेल्या टास्क फोर्सने आपला अहवाल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सादर केल्याचे समजते. त्यामध्ये भाजपामधील अंतर्गत कलह आणि जिल्हा प्रशासनाचा असहकार या कारणांमुळे भाजपाला मोठा फटका बसल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर योगी सरकारकडून लगेच जवळपास बारा जिल्ह्याधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. भाजपाला समाधानकारक मते न मिळालेल्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. (BJP)

(हेही वाचा – Land Jihad : उत्तन येथील बालेशाह पीर दरगाह अतिक्रमणाची पाठराखण करणाऱ्या तहसीलदार, तलाठ्याच्या चौकशीचा आदेश)

२७ पैकी केवळ ११ (-९) जागा भाजपाला

त्याचप्रमाणे तिकीट वाटपात झालेला गोंधळ, विरोधकांनी संविधानाबाबत निर्माण केलेली भीती आणि मायावती यांच्या पक्षाची मते समाजवादी पक्षाकडे वळाल्याने इंडी आघाडीला यश मिळाल्याचेही अहवालात म्हटले आहे. प्रामुख्याने दलित आणि मुस्लिम मते भाजपाच्या पारड्यात पडली नाहीत. भाजपाचे राज्यसभेचे खासदार पुरुषोत्तम रुपाला यांनी ठाकूर समाजाविषयी (राजपूत) केलेल्या विधानाचा फटका अनेक भागांत बसला. या विधानामुळे रुपाला हे राजकोटमध्ये विजयी झाले असले तरी यूपीतील पुर्वांचलमधील भाजपा उमेदवारांना दणका बसला. या भागात २७ पैकी केवळ ११ (-९) जागा भाजपला मिळाल्या. (BJP)

भाजपाचे राज्यसभेचे खासदार पुरुषोत्तम रुपाला यांनी ठाकूर समाजाविषयी (राजपूत) केलेल्या विधानाचा फटका अनेक भागांत बसला. या विधानामुळे रुपाला हे राजकोटमध्ये विजयी झाले असले तरी यूपीतील पूर्वांचलमधील भाजपा उमेदवारांना दणका बसला. या भागात २७ पैकी केवळ ११ (-९) जागा भाजपाला मिळाल्या. उत्तर प्रदेशातील भाजपाचे उमेदवार लल्लू सिंह यांच्यासह इतर काही नेत्यांनी उघडपणे संविधान बदलाची भाषा केली होती. हाच मुद्दा निवडणुकीत विरोधकांनी उचलून धरला आणि संपूर्ण प्रचारात रान उठवले. त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे भाजपाचे नेतेही मान्य करत आहेत. टास्क फोर्सनेही पराभवामागे हे कारण दिले आहे. (BJP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.