दिल्ली विधानसभा निवडणुकीचे (Delhi Assembly Result 2025) चित्र आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. दिल्लीत भारतीय जनता पक्ष सरकार स्थापन करणार आहे. भाजपा ४८ जागांवर आघाडीवर आहे आणि आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) २२ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Ex Post) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून या विजयाबद्दल दिल्लीतील जनतेचे आभार मानले आहेत. यासोबतच, विकसित भारताच्या निर्मितीमध्ये दिल्लीची भूमिका महत्त्वाची राहील असे विधान एक्सच्या माध्यामातून केले. ( PM Narendra Modi)
जनशक्ति सर्वोपरि!
विकास जीता, सुशासन जीता।
दिल्ली के अपने सभी भाई-बहनों को @BJP4India को ऐतिहासिक जीत दिलाने के लिए मेरा वंदन और अभिनंदन! आपने जो भरपूर आशीर्वाद और स्नेह दिया है, उसके लिए आप सभी का हृदय से बहुत-बहुत आभार।
दिल्ली के चौतरफा विकास और यहां के लोगों का जीवन उत्तम…
— Narendra Modi (@narendramodi) February 8, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्स पोस्टवर म्हणाले की, ‘लोकशक्ती ही सर्वोपरि आहे!’ विकास जिंकला, सुशासन जिंकले… “भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल दिल्लीतील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना माझा सलाम आणि अभिनंदन!” तुम्ही दिलेला आशीर्वाद आणि प्रेमाबद्दल मी तुम्हा सर्वांचा मनापासून आभारी आहे.
विकसित भारताच्या उभारणीत दिल्ली महत्त्वाची भूमिका बजावेल
पंतप्रधान मोदींनी एक्सवर लिहिले आहे की, दिल्लीच्या (Delhi) सर्वांगीण विकासासाठी आणि येथील लोकांचे जीवन चांगले करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, ही आमची हमी आहे. यासोबतच, आम्ही हे देखील सुनिश्चित करू की विकसित भारताच्या निर्मितीमध्ये दिल्ली महत्त्वाची भूमिका बजावेल. तसेच इंस्टाग्रामवर लिहिले की, या प्रचंड बहुमतासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या माझ्या सर्व भाजपा (BJP) कार्यकर्त्यांचा मला खूप अभिमान आहे. आता आम्ही दिल्लीच्या जनतेची सेवा करण्यासाठी आणखी दृढपणे समर्पित राहू.
(हेही वाचा – Delhi assembly election :दिल्लीत भाजपाच्या विजयाची ‘ही’ आहेत प्रमुख कारणे)
पंतप्रधानांनी आपत्ती सरकारला हटवण्याचे आवाहन केले होते
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता आणि दिल्लीतील आप सरकारला आपत्तीचे सरकार म्हटले होते. पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील जनतेला या आपत्ती निर्माण करणाऱ्या सरकारपासून दिल्ली मुक्त करण्याचे आवाहन केले होते आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून हे स्पष्ट झाले आहे की, दिल्ली निवडणुकीत भाजपाला प्रचंड बहुमत मिळाले असून आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community