एकनाथ शिंदेंच्या बंडा मागे कोणती आहेत मुख्य कारणे?

117
शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांनी ३५ हुन अधिक आमदारांना घेऊन ते महाराष्ट्राबाहेर गेले आहेत आणि त्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. एकनाथ शिंदे हे मागील ४ दशकांपासून शिवसेनेत कार्यरत आहेत. शिवसेनेत पहिल्या फळीपर्यंत पोहचलेले शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. कारण पक्षात अचानक उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचे वर्चस्व वाढत आहे, त्यावर एकनाथ शिंदे यांची प्रमुख नाराजी आहे का, असे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

एकनाथ शिंदेंच्या नाराजीची संभाव्य कारणे काय?

  • एकनाथ शिंदे हे सध्या नाराज आहेत मात्र त्यांची नाराजी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाही, तर ते आदित्य ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. मुख्यमंत्रीपदावर विराजमान असलेल्या आणि महाविकास आघाडीचे प्रमुखपद सांभाळणाऱ्या उद्धव ठाकरेंचे नेतृत्व शिंदेंना मान्य आहे, मात्र आदित्य ठाकरेंचे वर्चस्व मान्य करण्यास त्यांचा नकार असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा पक्षाच्या प्रमुखांनाच पक्षाबाहेर काढणारे आतापर्यंतचे राजकीय बंड )

  • शिवसेना पक्षाची सूत्रे गेल्या काही महिन्यांत आदित्य ठाकरे यांच्या हाती एकवटली होती. संघटनेचे महत्त्वाचे निर्णय आदित्य ठाकरे घेऊ लागले आहेत. याबद्दल शिंदे यांची नाराजी आहे.
  • महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे यांचे महत्त्व गेल्या काळात वाढले होते. एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्यात आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत होते.
  • आदित्य ठाकरे यांच्या वाढत्या वर्चस्वाबाबत एकनाथ शिंदे यांनी उद्धव आणि रश्मी ठाकरे यांच्याकडे बोलणे केले होते. मात्र आदित्य यांनाच झुकते माप मिळाल्यामुळे शिंदे आणखी खट्टू झाल्याचे बोलले जात आहे.
  • विधान परिषद निवडणूक आणि राज्यसभा निवडणूक यामध्ये आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात मतभेद वाढले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.