राष्ट्रवादीचे खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे गांधी वधावर आधारित Why I Killed Gandhi या चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. त्यात कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारल्याने कोल्हे यांच्यावर टीकेची झोड उगारली जात आहे, त्यामध्ये एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. अखेर पवार यांनी यावर प्रतिक्रिया देत कोल्हे यांची पाठराखण केली आहे.
काय म्हणाले पवार?
खासदार कोल्हे यांच्या Why I Killed Gandhi या चित्रपटाचा प्रोमो जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा बरीच उलटसुलट चर्चा सुरु झाली. एनसीपीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्या प्रथम याला विरोध केला होता. त्यानंतर आता एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया देत ‘गांधी सिनेमा सगळ्या जगात गाजला. त्या सिनेमात सुद्धा नथुराम गोडसेची भूमिका होती. नथुराम गोडसेंची भूमिका केली तो कलाकार होता. कलाकार म्हणून कोल्हेंच्या या भूमिकेकडे पाहिले पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत जो औरंगजेबाची भूमिका करतो. त्यात तो मुघलांचा समर्थक होत नाही, किंवा राम -रावणाच्या भूमिकेत रावणाची भूमिका करणाऱ्याने सीतेचं अपहरण केलं असं होत नाही, असे पवार म्हणाले.
(हेही वाचा नथुराम गोडसेंची भूमिका आव्हानात्मक! अमोल कोल्हेंची कबुली)
जयंत पाटलांचेही समर्थन
तर एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही, कोल्हे यांनी अभिनेते म्हणून त्यांनी ही भूमिका साकारली आहे. त्यामुळे त्यावर आक्षेप घ्यायची गरज नाही. चित्रपटात कुणी गुंडाची भूमिका केली म्हणून आपण तो कलाकार त्या गुंडाच्या विचारांचा समर्थक आहे, असे म्हणता येणार नाही. आज यावर शरद पवार यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की,
Join Our WhatsApp Community