राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक न लढण्याची नाटकं का करत आहेत?

कॉंग्रेस हा पक्ष सध्या इतर कोणत्याच पक्षाशी लढत नसून केवळ गांधी कुटुंबाला कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर बसवण्यासाठी संघर्ष करत आहेत. ड्युप्लिकेट गांधींच्या नादाला लागून या मोठ्या पक्षाची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. आजही अनेक लोकांना गांधी आडनावाचाच अध्यक्ष हवा आहे. राहुल गांधी हे असे नापास विद्यार्थी आहेत जे दरवर्षी परीक्षेला बसतात आणि दरवर्षी नापास होतात.

( हेही वाचा : रणबीर कपूरसाठी ‘बीफ’ ठरला काळ)

राहुल गांधींच्या नेतृत्वात कॉंग्रेस एका प्रादेशिक पक्षापेक्षाही लहान पक्ष झाला आहे. आता कॉंग्रेसची अंतर्गत निवडणूक होणार आहे. राहुल गांधी ही निवडणूक लढणार नाहीत अशी चर्चा आहे. कारण सध्या ते भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. अध्यक्षपदासाठी नाव देण्यासाठी राहुल गांधींना स्वतः उपस्थित राहावं लागेल, त्याशिवाय ते आपलं नाव नोंदवू शकत नाही.

मग आता अध्यक्ष कोण होणार? पुन्हा सोनिया गांधी अध्यक्ष झाल्या तर ते चांगलं दिसणार नाही. आजीसारखं नाक घेऊन आलेल्या प्रियंका वाड्रा देखील आहेत. पण सध्या त्यांच्या नावाची चर्चा होताना दिसत नाही. जर राहुल गांधींनी आपलं नाव नोंदवलं नाही तर अशोक गेहलोत आपलं नाव पुढे करतील अशी चर्चा आहे. त्याआधी अशोक गेहलोत राहुल गांधींची समजूत काढणार आहेत. जर राहुल तरी देखील ऐकत नसतील तर मात्र गेहलहोत अध्यक्षपासाठी उमेदवार म्हणून उभे राहतील.

पण मला असा प्रश्न पडला आहे की हे नाटक का केलं जात आहे? गांधी कुटुंबाव्यतिरिक्त कुणीही अध्यक्ष होणार नाही हे चित्र स्पष्ट असताना हे नाटक का? गांधी कुटुंबाला कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी राहायचं आहे कारण कॉंग्रेसच्या नावावर असलेली मालमत्ता त्यांना सोडायची नाही. एकदा का कॉंग्रेसमधून आपण बाहेर झालो तर ही एवढी मोठी मालमत्ता आपल्या हातून निसटेल अशी चिंता गांधी कुटुंबाला सतावत आहे. मग हे नाटक का?

याची दोन कारणे असू शकतील. मनमोहन सिंह पंतप्रधान झाले तेव्हा सोनिया गांधी यांनी केवढा मोठा त्याग केला अशी चर्चा रंगवण्यात आली होती. पण मनमोहन सिंह हे सोनिया गांधींच्या मर्जीतले होते किंबहुना सोनिया गांधींनी उठ म्हटलं तर उठायचे आणि बस म्हटलं तर बसायचे. तर असाच सांग काम्या नि हो नाम्या प्रकारचा अध्यक्ष बसवून गांधी कुटुंबाला पक्ष चालवायचा असेल. जेणेकरून पराभवाचं खापर अध्यक्षावर फोडता येईल.

दुसरं कारण म्हणजे गांधींची जुनी रणनिती… राहुल माघार घेत आहेत असं दाखवायचं आणि सर्वांनी राहुल गांधींची समजूत काढायची. मग अचानक आपल्या मनात नसताना केवळ कार्यकर्त्यांसाठी हा पदभार आपण स्वीकारत आहोत असे दाखवता येईल. जोपर्यंत कॉंग्रेसमध्ये एखादा एकनाथ शिंदे जन्माला येत नाहीत तोपर्यंत ही नाटकं चालतच राहणार.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here