‘इंडिया’ आघाडीतील पक्षाचे नेते सनातन धर्माचा अवमान करीत आहे आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मौन धारण केले आहे. यामुळे ‘इंडिया’ आघाडीचा जन्म सनातन धर्माचा अवमान करण्यासाठीच झाला आहे काय? असा प्रश्न भाजपने विचारला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी आज सोनिया गांधी यांना मौन व्रत सोडण्याचे आवाहन केले आहे. इंडिया आघाडतील नेते सनातन धर्माचा अपमान करीत आहेत. अशात आपण तोंडावर पट्टी बांधून कशा असू शकता? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
तामिळनाडूचे राज्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी अलिकडेच सनातन धर्माबाबत वादग्रस्त टिप्पणी केली होती. सनातन धर्म हा डेंग्यू आणि मलेरियासारखा आहे. आघाडीचे नेते एवढ्यावरच थांबले नाहीत तर द्रमुक नेते ए. राजा यांनी सनातन धर्माची तुलना एड्सशी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी स्वत:ला ब्राम्हण म्हणवून घेतात. मग, सनातन धर्माचा घोर अपमान होत असताना सोनिया गांधी गप्प का बसल्या आहेत? असा प्रश्न भाजपने आज उपस्थित केला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, सनातन धर्म नष्ट करण्यासाठीच ‘इंडिया’ची निर्मिती झाली.
रविशंकर प्रसाद म्हणाले की, “द्रमुकचे शिक्षणमंत्री पोनमुडी यांचे वक्तव्य समोर आले आहे. इंग्रजीत ‘द कॅट इज आऊट ऑफ द बॅग’ अशी म्हण आहे. त्याचा हेतू आता स्पष्ट होऊ लागला आहे. सनातन धर्माला विरोध करण्यासाठी भारत आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. ते पुढे म्हणाले, “सनातन धर्माला विरोध करून व्होट बँकेचे राजकारण करणे हा विरोधी आघाडीचा अजेंडा आहे. इतर कोणत्याही धर्माच्या देवांवर टीका करण्याचा अधिकार आहे का? त्यांच्यात हिंमत आहे का? ते हे करू शकतात का?… अशा कितीतरी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी लावली.
प्रसाद यांनी या मुद्द्यावरून काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींवरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, पहिला प्रश्न सोनिया गांधींना आहे. भाजपच्या वतीने सोनिया गांधी यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले असून भारताची संस्कृती, वारसा आणि सनातन धर्माचा दररोज अपमान होत आहे. पण सोनिया गांधी यावर गप्प का आहेत. का? प्रसाद यांनी सोनिया गांधीच नव्हे तर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वाड्रा यांनाही मौन सोडण्याचे आवाहन केले आहे.
(हेही वाचा – New Parliament : संसदेच्या कर्मचारी वर्गाचा गणवेश बदलणार)
प्रसाद यांनी काँग्रेसशिवाय अन्य विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. “द्रमुकपासून ते राष्ट्रीय जनता दल आणि समाजवादी पक्ष अशा काही पक्षांचे विरोधी नेते सनातन धर्म आणि हिंदू धर्माशी संबंधित पवित्र ग्रंथांवर टीका करीत आले आहेत. पण, अन्य धर्मांच्या ग्रंथावर टीका करण्याची हिंमत त्यांच्यात आहे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.दरम्यान, भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह साध्वी यांनी सनातन धर्माच्या विरोधात बोलणाऱ्यांवर हल्लाबोल करत सनातन धर्म हा एकमेव धर्म आहे. बाकी सर्व विचार आणि पंथ आहेत, असे त्या म्हणाल्या. सनातन धर्म संपविण्याची ताकद कुणातही नाही. परंतु, जे नेते सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया, एड्स, कुष्ठरोगाशी करीत आहेत ईश्वराने त्यांना या सर्व आजारांचे सुख द्यावे, असे आवाहनही साध्वी प्रज्ञा यांनी केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community