सध्या धारावीचा (Dharavi) पुनर्विकासाचा मुद्दा पेटलेला आहे. या भागाचा विकास अदानीच्या माध्यमातून करून भाजप अदानींचा फायदा करून देत आहे, त्यामुळे याला विरोध करत धारावीचा विकास सरकारने करावा, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मुंबईत मोर्चाही काढण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरे हे धारावी विकास प्रकल्पाला का विरोध करत आहेत, यामागची कारणे सांगितली.
काय म्हणाले मोहित कंबोज?
भाजप नेते मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर एक ट्विट केले. ज्यामध्ये त्यांनी “उद्धव ठाकरेंना अदानींकडून 10 अब्ज रुपयांची वसुली करायची आहे. उद्धव यांना दुबईत हॉटेल खरेदी करायचे आहे, ज्याचे डील काही दिवसांपूर्वी छोटे ठाकरेंनी केली आहे. धारावी (Dharavi) पुनर्विकास प्रकल्पात कमिशन मिळवण्यासाठीच ठाकरेंचा अदानींना विरोध होत आहे. उद्धवजी या मागचंचे कारण काय आहे ते तर सांगा. गौतम अदानी कालपर्यंत तुमचे प्रिय मित्र होते. तुम्ही एकमेकांचे मित्र होते. अदानी तुमच्या घरी यायचे, तर कधी तुम्ही अदानींच्या घरी जायचे. आता तुम्ही त्यांचे एवढे विरोधक कसे बनले?, असा सवाल मोहित कंबोज यांनी केला. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी अनेक वेळा गौतम अदानी यांच्याकडून फायदा करुन घेतलाय. तर मग आता कोणत्या टीडीआरच्या माध्यमातून वसुली पाहिजे की मातोश्री 3 बनवायचं आहे?, असा खोचक सवाल मोहित कंबोज यांनी केला. उद्धव ठाकरे उद्योगपती गौतम अदानी यांच्या खासगी विमानाचा वापर करायचे. ठाकरेंनी दिल्ली आणि संभाजीनगरला जाण्यासाठी अदानींचे विमान वापरले होते. विमान वापरल्याचे पैसे दिले नाहीत, असाही आरोप मोहित कंबोज यांनी केला.
(हेही वाचा Sarathi : ‘सारथी’च्या चौकशी अहवालात दडलंय काय?)
Join Our WhatsApp Community