उद्धव ठाकरे सेक्युलर मुद्दे का उचलून धरत आहेत?

89

आपणच कट्टर हिंदुत्ववादी आहोत अशा गर्जना उद्धव ठाकरे यांनी अनेकदा केलेल्या आहेत. आपला भगवा किंवा आपलं हिंदुत्व खरं आहे, बाकी सगळे खोटे आहेत असा अविर्भाव घेऊन ठाकरे वावरत असतात. कै. बाळासाहेब ठाकरे हे हिंदुंचे मोठे नेते म्हणून ओळखले जायचे. मी अनेकदा अमराठी लोकांना बोलताना ऐकलेलं आहे की, ’बालासाहब की वजह से मुंबई में हिंदू हैं.” त्यांच्या या बोलण्यात तथ्य आहे की नाही या वादात न पडता, आपण हे समजून घेऊया की, उद्धव ठाकरे अशा पित्याचे पुत्र आहेत ज्यांना हिंदुंचं प्रेम मिळालं आणि त्यांना हा वारसा मिळालेला आहे.

आरे आणि बुलेट ट्रेनला विरोध करुन सेक्युलरांच्या अगदी जवळ गेले

उद्धव ठाकरे वरवर बोलताना असं म्हणतात की ते हिंदुत्ववादी आहेत पण त्यांच्या मनात हिंदुत्व आहे असं वाटत नाही. कारण ठाकरे जे मुद्दे उचलतात ते मुद्दे सेक्युलरांचे आहेत. सेक्युलर नेहमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करतात. उद्धव ठाकरेंनी संघावर टीका करुन सेक्युलरांचा खुश केलेलं आहे. सेक्युलरांचा एक महत्वाचा उद्योग म्हणजे नरेंद्र मोदींच्या प्रत्येक धोरणावर विरोध करायचा. ठाकरे आरे आणि बुलेट ट्रेनला विरोध करुन सेक्युलरांच्या अगदी जवळ गेले आहेत.  आता १५ ऑगस्टला आपण आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणार आहोत. आपण रस्त्याने चालताना देखील पाहू शकतो की, अनेकांनी आपल्या घरावर तिरंगा लावलेला आहे. जनतेला सोबत घेऊन चालणारा कोणताही नेता, हा जनतेला कामे देत असतो. सगळ्यांनाच समाजसेवा करायला जमत नाही. सामान्य माणूस १२ तास काम करुन थकलेला असतो. त्यालाही देशासाठी काहीतरी करावं असं वाटत असतं. पण त्याच्या दैनंदिन आयुष्यामुळे त्याला हे जमत नाही. मग त्या सामान्य माणसाला जे जमेल, ते काम द्यायचं असतं. त्यालाही वाटलं पाहिजे की आपणंही या सामाजिक उपक्रमात सहभागी झालो आहोत.

(हेही वाचा धर्मांतर केल्यास १० वर्षांची शिक्षा, हिमाचलमध्ये कायदा मंजूर)

ठाकरे पूर्वीपासूनच सेक्युलर होते, हिंदुत्वाची शाल पांघरुन?  

म्हणून कोरोना काळात थाळ्या वाजवण्याचा आणि दिवे लावण्याचा उपक्रम राबवण्यात आला. जेणेकरुन जनतेला असं वाटलं की आपणंही कोरोनाशी लढत आहोत. आता हर घर तिरंगा या उपक्रमाद्वारे सबंध देशाला या उत्सवात सामील करुन घ्यायचे आहे. इतकी वर्षे अनेक लोक १५ ऑगस्टची सुट्टी कशी साजरी करायचे. सगळेच जण काय झेंडावंदन कार्यक्रमाला उपस्थित राहत नव्हते, सगळ्याच सोसायटीत हा कार्यक्रम व्हायचा असे नाही. आता बहुसंख्य लोक स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहेत. लोकांचा उत्साह पाहायला मिळतोय. अशा आनंदाच्या वातावरणात उद्धव ठाकरेंनी पुन्हा सेक्युलर विधान केलेलं आहे की, “घराचा नाही पत्ता, 75 वर्ष झालेली आहेत. ज्यांच्याकडे घरच नाही ते तिरंगा लावणार कुठे?” हा उद्धव ठाकरेंचा प्रश्न योग्य आहे असं आपण मानलं तर हा प्रश्न त्यांना सोनिया गांधी यांना विचारता येईल. आता नरेंद्र मोदींनी अनेकांना घर देण्याचा उपक्रम राबवला आणि तो उपक्रम, ती योजना हळूहळू यशस्वी होताना दिसत आहे. मग गेली ७० वर्षे सोनिया गांधींच्या कॉंग्रेस पक्षाने लोकांना घर का मिळवून दिले नाही? पत्राचाळ घोटाळा करुन ठाकरेंच्या जीवलग मित्राने संजय राऊत यांनी लोकांना बेघर का केलं? हा प्रश्न ठाकरेंना का पडत नसावा? ठाकरे आत अपूर्णपणे सेक्युलर झालेले आहेत. ते सेक्युलरांची भाषा व्यवस्थित शिकलेले आहेत की ते पूर्वीपासूनच सेक्युलर होते, हिंदुत्वाची शाल पांघरुन?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.