मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प मंगळवार, २३ जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सकाळी ११ वाजता मांडला. याआधीही अर्थससंकल्प दुपारी २ वाजता किंवा सायंकाळी ५ वाजता मांडण्याची प्रथा होती, मात्र ही वेळ आता बदलण्यात आली आहे. (Indian Budget 2024)
वेळ बदलण्यामागील काय आहे कारण?
स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीचे ठरावे म्हणून अर्थसंकल्प सायंकाळी ५ वाजता सादर करण्याची प्रथा सुरु केली होती. कारण भारतात सायंकाळी ५ वाजता अर्थसंकल्प सादर केल्यावर त्याचा वेळी लंडनमध्ये तो दुपारी १२.३० वाजता दिसायचा वसाहतवादाच्या काळात हा ब्रिटिशांनी हा निर्णय घेतला. मात्र भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताने यात बदल करण्याचा निर्णय घेतला. १९९९ साली या प्रथेमध्ये बदल करण्यात आला. तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय घेतला. २७ फेब्रुवारी १९९९ रोजी, अटल बिहारी वाजयेपी सरकारमधील अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्पीय भाषणास सुरुवात केली. मोदी सरकारच्या काळातही ही प्रथा पाळण्यात आली आहे. निर्मला सीतारामण यांनी सलग सातवेळा केंद्रीय अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडणाऱ्या (Indian Budget 2024) पहिल्याच व्यक्ती ठरल्या आहेत.
Join Our WhatsApp Community