अफगाणिस्तान का बनतोय महासत्तांसाठी स्मशानभूमी? जाणून घ्या… 

मागील २० वर्षांत हजारो अमेरिकन सैन्यांना प्राण गमवावे लागले होते. १८व्या आणि १९व्या शतकात हीच अफगाणिस्तान भूमी ब्रिटिश आणि सोव्हिएत युनियन यांसारख्या महासत्तांसाठी स्मशानभूमी बनली होती. 

154

अफगाणिस्तान पुन्हा एकदा रणांगण बनले आहे आणि यात तिसऱ्या बलाढ्य देशाचा पराभव झाला आहे. हा बलाढ्य देश अमेरिका आहे. ११ सप्टेंबर २००१ रोजी तालिबानने अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरचे २ टॉवर नेस्तनाबूत केले, त्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला करून तालिबानी सत्ता उद्ध्वस्त केली होती. मात्र २० वर्षांनी अमेरिका बेजार झाली आणि तिने अफगाणिस्तानातील अंतर्गत दहशतीसमोर हात टेकले. २० वर्षांत हजारो अमेरिकन सैन्यांना प्राण गमवावे लागले. १८व्या आणि १९व्या शतकात हीच अफगाणिस्तान भूमी ब्रिटिश आणि सोव्हिएत युनियन यांसारख्या महासत्तांसाठी स्मशानभूमी बनली होती.

(हेही वाचा : तालिबानची दहशत: अमेरिकन म्हणतायेत ‘कम बॅक डोनाल्ड ट्रम्प’!)

१८व्या शतकात ग्रेट ब्रिटनने सोडला अफगाणिस्तानचा नाद! 

१८३० साली ग्रेट ब्रिटेनने २० हजार सैन्य अफगाणिस्तानात उतरवले होते. त्यानंतर ब्रिटेनने दोस्त महंमद खान यांना सत्तेवरून दूर केले होते. त्याठिकाणी ब्रिटेनने शाह सुजा दुरानी यांना बसवले. अशा प्रकारे ब्रिटेनने नवी वसाहत बनवली होती. मात्र ब्रिटेनला २ वर्षांत अफगाणिस्तानमध्ये वर्चस्व गाजवणे कठीण जाऊ लागले. ब्रिटेनला स्थानिकांचा विरोध कायम होऊ लागला. २३ नोव्हेंबर १८४१ रोजी ब्रिटेनने अफगाणिस्तानसाठी जो मध्यस्थ नेमला होता, ते सर विल्यम मॅकटन यांची हत्या करण्यात आली. जानेवारी १८४२ पासून ब्रिटेनचे काबूलवरील नियंत्रण सुटले आणि ४ हजार ५०० ब्रिटेनचे सैन्य काबूलमधून बाहेर पडले. त्याच दरम्यान ब्रिटेनने अफगाणिस्तानच्या सत्तेवर बसवलेला शाह सुजा दुरानी यांची काबूलमध्येच हत्या करण्यात आली आणि अफगाणिस्तानवर पुन्हा दोस्त महंमद खान यांची सत्ता आली.

१९व्या शतकात सोव्हिएत युनियन अफगाणिस्तानातून पळाला! 

अफगाणिस्तानात साम्यवाद्यांची सत्ता असावी म्हणून २७ एप्रिल १९७८ रोजी सोव्हिएत युनियनने तेथील सत्तेवरून महंमद दाऊद खान याला खाली खेचले. महंमद दाऊद खान हा डाव्या विचारांचा होता, पण साम्यवादी नव्हता. २८ एप्रिल १९७८ रोजी सोव्हिएतने नूर महंमद ताकीर याला सत्तेवर बसवले. अफगाण रिव्हॉलेशनरी कौन्सिलच्या नावाने सत्ता स्थापन झाली. १९८०मध्ये अफगाण सैन्याने सोव्हिएत युनियनच्या २० सैनिकी सल्लागारांना ठार केले. त्यानंतर सोव्हिएतच्या सैन्यांना ठार करू लागले. ऑगस्ट १९८०मध्ये सोव्हिएत युनियनचे काबूलवरील ७५ टक्के नियंत्रण सुटले. १९७८ ते १९८९ या वर्षांत सोव्हिएत युनियनचे तब्बल १५ हजार सैन्य ठार झाले. अखेर सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तानातून पाय काढला.

(हेही वाचा : अफगाण मुस्लिम बनले शरणार्थी! भारतीय मुस्लिम होतायेत टीकेचे धनी!)

२०व्या शतकात अमेरिका अफगाणिस्तानसमोर नमवले! 

११ सप्टेंबर २००१ रोजी अफगाणिस्तानातील त्यावेळीचे सत्ताधीश तालिबान्यांनी अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेंड सेंटरच्या २ टॉवरवर हल्ला करून ते जमीनदोस्त केले. त्यानंतर त्यावेळीचे  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी अफगाणिस्तानवर हल्ला करून तालिबानी सत्ता उद्धवस्थ केली. पुढे अमेरिकेने त्याठिकाणी लोकशाही तत्वावर सत्ता स्थापन केली. मागील २० वर्षांत अमेरिकेचे २ हजार ४४८ सैन्य, ३ हजार ८४६ कॉन्ट्रॅक्टर, ६६ हजार अफगाणचे पोलिस, नाटोचे सदस्य असलेल्या देशांचे १ हजार १४४ सैन्य ठार तालिबान्यांनी ठार केले. जून २०२१ पासून अमेरिकेने सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर २ महिन्यांतच तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर हल्ला करायला सुरुवात केली आणि १६ ऑगस्ट २०२१ यादिवशी तालिबानांनी दहशतवाद्यांनी राष्ट्रपती भवन ताब्यात घेऊन अवघ्या अफगाणिस्तानची सत्ता काबिज केली. ज्या अमेरिकेने तालिबान्यांची सत्ता उद्ध्वस्त केली होती, तिच आर्थिक महासत्ता अमेरिका आज तालिबान्यांना अफगाणिस्तानातून अमेरिकन नागरिकांना सुरक्षितपणे अमेरिकेत परत येऊ द्यावे, अशी विनंती करताना अवघ्या जगाने पहिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.