उद्धव ठाकरे हे प्रत्येक गोष्ट विश्वासात घेऊन करतात. २०१९मध्ये बंद खोलीत झालेल्या चर्चेचा तपशील उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सांगितलं होता. मात्र तो शब्द पाळला नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शिवसेनेने मोदींना पाठिंबा दिला, ताकीद दिली. राजकारणात कितीही उलथापालथ झाली तरी उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचे नाते कायम असणार आहे. २०१४ साली भाजपाने युती तोडली होती, त्यावेळी या १२ खासदारांपैकी किती खासदारांनी यावर भाजपाला प्रश्न विचारला होता, आता २०१९ मध्येही भाजपामुळेच युती तुटली, तेव्हा या खासदारांनी का प्रश्न विचारला नाही, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.
भाजपानेच शिंदेची फसवणूक केली
आम्ही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेणारच होतो, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी या खासदारांना ‘जर आपण पाठिंबा दिला, तर तुम्ही शिवसेनेतच राहणार का’, असे विचारले होते. त्यावेळी ते ‘हो’ म्हणाले होते. असा खासदारांवर काय विश्वास ठेवायचा? बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाला मानता असे म्हणता, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर ज्या प्रकारे शाब्दिक हल्ला करण्यात आला, त्यांची बदनामी करण्यात आली, त्यावेळी यापैकी किती जण शिवसेनेच्या बाजूने ठामपणे उभे राहिले होते? आताही ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत घाणेरड्या शब्दांत हल्ले झाले, तेव्हा हे खासदार कुठे होते, त्यामुळे या खासदारांना यावर काही बोलण्याचा अधिकार नाही, आम्ही सातत्याने पक्षाची भूमिका मांडत राहिलो, असे संजय राऊत म्हणाले. एनडीएतून आम्ही बाहेर पडलो आहे, हे वारंवार सांगितले आहे, त्यासाठी आता प्रतिज्ञापत्र द्यायचे का, आम्ही ना एनडीएमध्ये होतो ना युपीएमध्ये आहे. जर मुख्यमंत्री पदाबाबत भाजपने दिलेला शब्द पाळला असता तर शिवसेनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच असते. खरेतर भाजपानेच शिंदेची फसवणूक केली आहे. विधिमंडळ, संसदेत असे अनेकदा प्रसंग घडलेले आहेत, तुमच्याकडे आज आकडा आहे, पण २०२४ मध्ये आकडे वेगळे असतील. तेव्हा मॅटेनी शो आमचा असेल आणि दिवसभरातील ‘शो’ही आमचेच असतील, मॅटेनी शो ला अनेक वर्षे शोले चित्रपट लागत होता, आजही मराठी चित्रपट मॅटेनीलाच होतात, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या टीकेवर संजय राऊत यांनी पलटवार केला.
(हेही वाचा ‘एक वर्षापूर्वी ठाकरे-मोदी भेटीत झाली होती युतीबाबत चर्चा’, राहुल शेवाळेंनी केले अनेक गौप्यस्फोट)
Join Our WhatsApp Community