- सुजित महामुलकर
महायुतीतील भाजपा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बीडच्या (Beed) पालक मंत्री पदावरून वाद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
(हेही वाचा – बेस्टच्या ताफ्यात लवकरच १३०० बसेस येणार; CM Devendra Fadnavis यांची विधान परिषदेत माहिती)
पंकजा परिषदेवर; धनंजय विधानसभेत
फडणवीस सरकारमधील ३९ आमदारांनी रविवारी १५ डिसेंबर २०२४ या दिवशी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यात भाजपाच्या पंकजा मुंडे तर त्यांचे चुलत भाऊ आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचाही समावेश आहे. धनंजय मुंडे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव केला. त्यानंतर पंकजा यांना २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने तिकीट दिले, मात्र या निवडणुकीतही पंकजा यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून पराभवाचाच सामना करावा लागला. त्यानंतर पंकजा यांना पक्षाने विधान परिषदेवर पाठवले. आता त्यांची वर्णी मंत्रीपदावर लावण्यात आली आहे. धनंजय हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी होऊन दुसऱ्यांदा (२०१९, २०२४) आमदार (विधानसभा सदस्य) झाले. २०१४ ते २०१९ या काळात पंकजा विधानसभेत तर धनंजय विधान परिषदेत विरोधी पक्षनेता होते. (Beed)
(हेही वाचा – WPL Auction : डब्ल्यूपीएल लिलावातील सगळ्यात महागडी खेळाडू सिमरन शेख कोण आहे?)
त्याग कोण करणार?
एकाच जिल्ह्यात वेगवेगळ्या पक्षाकडून दोन मंत्री पदे आणि तेही भाऊ-बहीण, यामुळे दोन्ही पक्षांपुढे नवा राजकीय पेच निर्माण झाला आहे. महायुतीने ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली त्या धर्तीवर धनंजय बहिणीसाठी पालक मंत्री पद सोडणार का? तर पंकजा सलग दोनवेळा विधानसभेवर निवडून आलेल्या लाडक्या भावासाठी पालक मंत्रीपदाचा त्याग करणार का? असे सवाल केले जात आहेत. (Beed)
(हेही वाचा – WPL Auction : १६ व्या वर्षी करोडपती झालेली कमलिनी कोण आहे?)
रायगड जिल्ह्यातही नवा वाद
दीड वर्षांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ४० आमदार फोडून महायुतीला साथ दिली. त्यानंतर त्या ४० मधील काही ज्येष्ठ आमदारांना मंत्रीपदे देण्यात आली. काही जिल्ह्यात पालक मंत्री पदावरून महायुतीतील शिवसेना (शिंदे) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत वाद उफाळून आला होता. उदाहरणार्थ, रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे मंत्री होत्या, मात्र शिवसेनेचे आमदार आणि तत्कालीन ‘संभाव्य’ मंत्री भरत गोगावले यांनी विरोध केल्यामुळे आदिती यांना पालक मंत्रीपद देण्यात आले नव्हते. त्याऐवजी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सोपवण्यात आले होते आणि वादावर तोडगा काढला गेला. आता तर भरत आणि तटकरे दोघेही मंत्रिमंडळात असल्याने हा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच स्थिति कोकणसह अन्य काही जिल्ह्यात उद्भवण्याची शक्यता असल्याने अनेक जिल्ह्यांना परजिल्ह्यातील पालकमंत्री लाभले तर आश्चर्य वाटायला नको. (Beed)
(हेही वाचा – Mahayuti सरकारवर ३ हजारांहून अधिक प्रलंबित आश्वासनांचा बोजा)
… तर पालकमंत्रीपद तिसऱ्याकडेच?
मुंडे बहिण भावामध्ये सामंजस्याने तोडगा निघू शकला नाही तर बीडच्या पालक मंत्रीपदाची जबाबदारीही तिसऱ्याच मंत्र्यांवर सोपवण्याची शक्यता अधिक आहे. (Beed)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community