लोकसभा निवडणुक संपली असून, आता विधानसभेच्या निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडी आणि महायुतीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अशातच आता वरळी मतदारसंघ (Worli Constituency) हा चर्चेचा विषय ठरला आहे. वरळी मतदारसंघात मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. तर उबाठा गटाकडून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) लढतील असं बोललं जात आहे. अशातच आता कल्याण डोंबिवली मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदेंनी (Shrikant Shinde) सवाल करत आदित्य ठाकरेंना डिवचलं आहे. (Shrikant Shinde)
“आदित्य ठाकरे वरळीत उभे राहतील की दुसरा मतदारसंघ शोधणार?”
आदित्य ठाकरे वरळीत उभे राहतील की दुसरा मतदारसंघ शोधणार? असा सवाल श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी केला आहे. तेव्हा आदित्य ठाकरेंना त्यांनी डिवचलं आहे. यावेळी बोलत असताना श्रीकांत शिंदेंनी (Shrikant Shinde) महाविकास आघाडीवर आरोप केला. ते म्हणाले की महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत चुकीचा नेरेटिव्ह ठेऊन मतं मिळवली आहेत. (Shrikant Shinde)
(हेही वाचा – Mumbai-Pune Train: डेक्कन आणि इंटरसिटी एक्सप्रेस ३ दिवस बंद; कारण जाणून घ्या )
फेक नेरेटिव्ह ठेऊन महाविकास आघाडीने (Indi Alliance) मतं मिळवली आहे. परंतु हे टेम्पररी आहे. मात्र येत्या विधानसभेत महायुतीचंच सरकार येणार असल्याचं श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) म्हणाले आहेत. लोकांमध्ये संविधान खतरे मे असल्याचा प्रचारामुळे गैरसमज निर्माण झालाय. यामुळे मतदान हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना गेलं आहे. त्यामुळे त्यांचा विजय झाला असला तरीही ते टेम्पररी आहे.
(हेही वाचा – NEET UGच्या पुनर्परीक्षेत १५६३ पैकी ७५० विद्यार्थी गैरहजर, CBIने पहिला FIR नोंदवला)
कल्याणमध्ये आचार्य अत्रे रंगमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे खासदार श्रीकांत शिंदे, खासदार सुनील तटकरे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सुनील तटकरे काही कारणास्तव येऊ शकले नाहीत. यावेळी राष्ट्रवादी भाजपा आणि शिवसेना कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. श्रीकांत शिंदे म्हणाले की, लोकांना दिशाभूल एकदा करू शकता. वारंवार दिशाभूल होत नसते. येत्या विधानसभेला जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल, असं श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. (Shrikant Shinde)
हाच एक मोठा प्रश्न
विधानसभेला वरळीत कमळ फुलणार नाही, असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं होतं. त्यावरुन बोलताना श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला. पुढच्या वेळेस आदित्य ठाकरे वरळीत उभे राहतात की, घाबरून दुसरा मतदारसंघ शोधतात हाच एक मोठा प्रश्न आहे, असे श्रीकांत शिंदेंनी म्हटले. (Shrikant Shinde)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community