Ajit Pawar आणि Uddhav Thackeray निवडणूक स्वतंत्रपणे लढणार?

176
Ajit Pawar आणि Uddhav Thackeray निवडणूक स्वतंत्रपणे लढणार?
Ajit Pawar आणि Uddhav Thackeray निवडणूक स्वतंत्रपणे लढणार?

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. जसजशी निवडणूक जवळ येईल, तसतशी राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हेही दिसू लागली आहेत. कदाचित, महायुतीतून अजित पवार (Ajit Pawar) आणि महाविकास आघाडीतून शिवसेना उबाठा बाहेर पडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकतील, अशीही शक्यता नाकारता येत नाही.

अजित पवार महायुतीत राहतील की बाहेर पडतील?

गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी राष्ट्रवादी कॉँग्रेस (अजित पवार) विरुध्द शिवसेना-भाजपा यांच्यात वारंवार शाब्दिक संघर्ष उद्भवत असल्याने अजित पवार (Ajit Pawar) विधानसभा निवडणुकीपर्यंत महायुतीत राहतील की बाहेर पडतील? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. पण, महायुतीतून बाहेर पडल्यास अजित पवार यांच्याकडे कोणते पर्याय आहेत?

(हेही वाचा- Emergency चित्रपट Uncut स्वरूपातच प्रदर्शित करणार; कंगना रानौत यांचा निश्चय)

अजित पवारांशी युती: असंगाशी संग

गेले चार दिवस आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या ‘उलटी’ व्यक्तव्यावरून वादळ उठले आहे. त्यात भर पडली ती भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांच्या विधानाने. ‘दुर्दैवाने अजित पवारांच्या (Ajit Pawar) गटाशी युती झाली. आता भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाशी युती म्हणजे असंगाशी संग,’ असे विधान हाके यांनी केले आणि नव्या वादाला तोंड फुटले.

माझेही कार्यकर्ते उत्तर देतील

अजित पवार (Ajit Pawar) यांनी मात्र राग नियंत्रणात ठेवत तीव्र प्रतिक्रिया देणे टाळले. नागपूर दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा म्हणाले, “मला कोणावरही टीका करायची नाही. मला कोणी बोलले तर माझ्या अंगाला काय भोकं पडत नाही. पण जर असं कुणी बोललं असेल तर माझेही कार्यकर्ते उत्तर देतील,” अशा सौम्य शब्दांत भाजपा-सेना नेत्यांना इशारा दिला.

(हेही वाचा- सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या Majhi Ladki Bahin Yojana च्या लाभार्थींसाठी महत्त्वाचे अपडेट)

मोठ्या पवारांकडे जाण्याचे वेध

सावंत यांच्या व्यक्तव्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी तर थेट युतीतून बाहेर पडण्याची भाषा केली. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे काही आमदारही या युतीत समाधानी नसल्याचे बोलले जात आहे. काहींना पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाण्याचे वेध लागले आहेत, याचे कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचा स्ट्राइक रेट आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची जागावाटपात भाजपासमोर घेतलेली बोटचेपी भूमिका. एकूणच अजित पवार यांच्यापेक्षा शरद पवार आजही जनमत अधिक असल्याची भावना त्यांच्यात वाढू लागली आहे.

अजितदादांकडे कोणते पर्याय?

आता राष्ट्रवादीने महायुतीची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाच तर अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे कोणते पर्याय असतील? एकतर अजित पवार यांना आपले काका शरद पवार यांची माफी मागून पुन्हा राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत जाणे हा असेल. मात्र पवार त्यांना परत पक्षात घेतील की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांच्यासमोर दूसरा पर्याय असेल स्वबळावर निवडणूक लढवण्याचा. अजित पवार यांचे प्रकाश आंबेडकर यांच्याशी कधी वैचारिक मैत्री होऊ शकत नाही इतकी या दोघांची टोकाची मते असल्याने वंचित बहुजन आघाडीशी कदापि युती करणार नाहीत, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या एका नेत्याने स्पष्टच सांगितले.

(हेही वाचा- BMC School : शिक्षणाचा दर्जा कसा उंचावणार? अनुभवी शिक्षक निवडणूक कामात, दीडशे रुपयांचे तासिका शिक्षक वर्ग खोल्यांवर!)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नाराजी

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रांमध्येही अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीमुळे भाजपाला लोकसभा निवडणूइत काही लाभ झाला नाही, उलट भाजपाची मते राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळाली, असा सूर व्यक्त करण्यात आला होता. केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तीन दिवसीय अधिवेशन सुरू असून अजित पवार यांच्याबाबत अंतर्गत चर्चा झाली. अजित पवार यांना महायुतीत सामावून घेण्याबाबत नाराजी व्यक्त केली गेली तसेच आता अजित पवार स्वतःहून महायुतीतून बाहेर पडतील, असा चर्चेचा एकंदरित सूर असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना आणि भाजपा युती कायम

तर शिवसेना आणि भाजपा युतीत कायम रहात निवडणुकीला सामोरे जातील. सेना-भाजपा युतीत भाजपाला अधिकाधिक जागा लढवता येतील शिवाय शिवसेनेची मूळ मते एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत कायम राहिल्याचे लोकसभेत दिसून आले. संघाचा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या शिवसेनेशी (शिंदे) युती करण्यास कोणतेही मतभेद नसल्याने भाजपा-सेनासोबत संघही विधानसभा निवडणुकीत ताकदीने काम करेल, असे एका कार्यकर्त्याने सांगितले.

(हेही वाचा- शंभर वर्षांची प्रतीक्षा संपली, Modi Govt कडून महाराष्ट्रासाठी नवीन रेल्वे मार्ग मंजूर)

उबाठाची अवस्था बिकट

दुसरीकडे, महाविकास आघाडीतही शिवसेना उबाठाची अवस्था बिकट झाली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहेऱ्यावर विधानसभा निवडणूक लढवण्याची मागणी कॉँग्रेस आणि शरद पवार यांनी साफ फेटाळून लावल्याने उबाठाच्या कार्यकर्त्यांनी कॉँग्रेस आणि शरद पवार यांच्या उमेदवारसाठी काम न करण्याचा निर्णय घेतला आहे, असे समजते. लोकसभा निवडणुकीत उबाठाचा स्ट्राइक रेटही सगळ्यात कमी असल्याने त्यांच्यावरदेखील स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा दबाव येऊ शकतो. मात्र, अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात वेगळे लढण्याची जी धमक आहे ती ठाकरे यांच्यात नाही. पण अजित पवार बाहेर पडले तर मात्र ठाकरेदेखील बाहेर पडून कॉँग्रेस-राष्ट्रवादी (शप) मैत्रीपूर्ण लढत लढू शकते, अशी चर्चा आहे.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.