वाळू माफियांना रोखण्यासाठी राज्य सरकारने आखलेल्या वाळू धोरणात काही त्रुटी आहेत. त्या त्रुटी दूर करून आणखी सुधारणा केल्या जातील. या धोरणात नव्या बाबींचा समावेश करताना कोणाचेही हित जपले जाणार नाही, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी बुधवारी (१३ डिसेंबर) विधानसभेत दिली. (Sand Policy)
काँग्रेसच्या नाना पटोले यांनी बुधवारी विधानसभेत शून्य प्रहारात महसूल विभागाने घोषित केलेल्या वाळू धोरणाचा मुद्दा मांडला. वाळू डेपो हे माफियांचे अड्डे बनले आहेत. ज्या उद्देशाने वाळू धोरण आणले त्याचा हेतू साध्य होताना दिसत नाही. सर्वसामान्यांना पाच ब्रास वाळू मोफत मिळत नाही. शिवाय वाळू अभावी शासकीय कामे बंद आहेत, अशी टीका पटोले यांनी केली. (Sand Policy)
(हेही वाचा – Adani Green Energy : अदानी समुह पुढील दहा वर्षांत हरित ऊर्जा क्षेत्रात १०० अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करणार)
या टीकेला उत्तर देताना विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी वाळू धोरणाला काही ठिकाणी यश आल्याचे तर काही ठिकाणी अपयश आल्याचे मान्य केले. वाळू माफियांना राजकिय पक्षांचे पाठबळ होते. त्यामुळे त्यांचा उच्छाद रोखण्यासाठी आणि त्यांचे सिंडिकेट मोडण्यासाठी आपण धोरण आणले. सरकार बदलले तरी माणसे तीच असतात, असे विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) म्हणाले. वाळू धोरणाच्या संदर्भात आमदारांची बैठक घेऊन अडचणी जाणून घेतल्या जातील. (Sand Policy)
वाळू ऐवजी क्रॅश सॅण्ड वापरायला परवानगी
अधिवेशन संपण्यापूर्वी धोरणातील नवीन बाबी समाविष्ट केल्या जातील. सर्वसामान्यांना त्यांच्या घरकुलासाठी पाच ब्रास वाळू मोफत मिळावी आणि सरकारी कामे वाळू ऐवजी क्रॅश सॅण्ड वापरायला परवानगी दिली जाईल, असे विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) म्हणाले. याआधी ज्यांच्याकडे याविषयी दायित्व होते ते त्यांनी पार पाडले नाही. जे त्यांना जमले नाही, ते मी करतो. आणि जे मला जमत नाही ते ते करतात, असा टोला विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावला. थोरात यांनी परवा, सोमवारी वाळू धोरणावरून विखे पाटील यांच्यावर टीका केली होती. (Sand Policy)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community