दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. कथित मद्य घोटाळा प्रकरणात ईडीने तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर केजरीवाल यांनी चौकशीसाठी हजर राहण्यास नकार दिला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना लवकरच अटक केली जाऊ शकते, असा अंदाज आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्यांनी वर्तवला आहे.
अरविंद केजरीवाल यांना अटक होणार ?
दरम्यान, ईडीचे पथक गुरुवारी (४ जानेवारी) मुख्यमंत्री केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना अटक करण्याची शक्यता आहे. अरविंद केजरीवाल सरकारमधील मंत्री आतिशी यांनी सोशल मीडियावर दावा केला आहे की, ईडी अरविंद केजरीवाल यांच्या घरावर छापा टाकणार असल्याचे वृत्त आहे. त्यांना अटक होण्याचीही शक्यता आहे.
(हेही वाचा – Cryptocurrency : देशभरात ६६०६ कोटींचा बिटकॉईन घोटाळा, नितीन गौरला ईडीने केली अटक)
अनेकांनी ट्विटच्या माध्यमातून आप नेते केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घरावर ईडीचे छापे आणि त्यांच्या अटकेचा अंदाज वर्तवला आहे. दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनीही ट्विटरवर पोस्ट केली आहे.
राज्यसभेचे खासदार आणि आपचे नेते संदीप पाठक यांनीही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर ईडीने उद्या सकाळी छापे टाकण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
(हेही वाचा – Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांना अटक करा; विश्व हिंदू परिषदेने केली मागणी)
‘आप’कडून ईडीला पत्र –
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी बुधवारी तपास यंत्रणेला पत्र लिहून आपण राज्यसभा निवडणुका आणि प्रजासत्ताक दिनाच्या तयारीत व्यग्र आहोत, मात्र ईडीच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार असल्याचे म्हटले. ‘आप’ च्या प्रमुखांनी एजन्सीला लिहिलेल्या त्यांच्या आधीच्या पत्रांना उत्तर दिले. ज्यामध्ये त्यांनी कथित तपास/चौकशी मागण्यामागील खरा हेतू आणि तपासाचे स्वरूप याबद्दल स्पष्टीकरण मागितले.
केजरीवाल यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढली –
दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अधिकृत निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा वाढवली आहे. प्रत्येक येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनावर लक्ष ठेवले जात आहे आणि चौकशीनंतर सुरक्षेची खात्री करूनच प्रवेश दिला जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community