उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू समजल्या जाणाऱ्या राम शिंदे यांचे नाव विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी आघाडीवर आहे. ते स्वतः मात्र मंत्रिपदासाठी आग्रही आहेत. सोमवारी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ‘नेमबाजी’चा आनंद लुटला. यावेळी त्यांनी साधलेले तीनही नेम चुकले असले, तरी राजकारणातला त्यांचा नेम सभापती पदावर लागेल की मंत्रीपदावर, याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली.
माजी गृहराज्यमंत्री आणि भाजपाचे विधानपरिषद आमदार प्रा. राम शिंदे यांनी सोमवारी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला भेट दिली. यावेळी त्यांनी हिंदुस्थान पोस्टच्या टीमशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील ‘रायफल शूटिंग’ उपक्रमाची पाहणी केली. यावेळी त्यांना नेमबाजी करण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी तीनवेळा लक्ष्यावर नेम साधला, परंतु अचूक लक्ष्यभेद करण्यात त्यांना अपयश आले.
नगर जिल्ह्यातील भाजपाचा आक्रमक आणि युवा चेहरा म्हणून ओळख असलेल्या राम शिंदे यांचे नाव विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी आघाडीवर आहे. मात्र ते स्वतः मंत्रिपदासाठी आग्रही आहेत. अशावेळी रायफलचा नेम चुकलेल्या राम शिंदे यांचा राजकारणातला नेम अचूक लागेल का, तो नेम मंत्रिपदावर असेल की सभापती पदावर, अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली.
(हेही वाचा – Maharashtra Budget Session 2023: शासन कांदा उत्पादकांच्या पाठीशी ठामपणे उभे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)
Join Our WhatsApp Community