भाजपाने देशात ४५ पेक्षा अधिक जागा जिंकल्यास तुम्ही राजकारण सोडाल, हा मर्दाचा शब्द द्या, आणि मविआने राज्यात १८ हून अधिक जागा जिंकल्यास मी राजकारण सोडेन, असे थेट आव्हान मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मंगळवारी (१६ एप्रिल) दिले. राज्यात आघाडी ४८ जागा जिंकेल तर भाजपा देशात ४५ जागा तरी जिंकेल का या उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाचा आमदार ॲड. आशिष शेलार यांनी खरपूस समाचार घेतला. (Ashish Shelar)
याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देताना आमदार ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले की, हे उद्धव ठाकरे यांचे विधान रेकॉर्ड करुन ठेवा. उद्धव ठाकरेजी तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल, मर्द आणि मर्दांचं नेतृत्व करीत असाल तर तुम्हाला माझे जाहीर आव्हान आहे. भाजपाने (BJP) देशात ४५ पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर उद्धव ठाकरेजी तुम्ही राजकारण सोडाल, असा मर्दांचा शब्द द्या आणि महाराष्ट्रात तुम्ही आमच्यामुळे गेल्यावेळीस १८ जागा जिंकल्या होत्या, यावेळी तुम्ही महाआघाडी म्हणून जर १८ च्यावर गेलात तर मी राजकारण सोडेन. हे माझे खुले आव्हान आहे. जर भाजपा (BJP) ४५ च्या वर गेलात तर राजकारणातून निवृत्ती घ्याल, अपमान सहन कराल याचा शब्द द्या, असे थेट आव्हान आशिष शेलार यांनी दिले आहे. (Ashish Shelar)
दरम्यान, आज लाँच केलेल्या उबाठा गटाच्या गाण्याविषयी माध्यमांनी विचारले असता ती मशाल आहे की, आईसक्रीमचा कोन आहे, लोकांना आता या गर्मीमध्ये आईसक्रीमचा कोन पाहिजे, मशाल नकोय. मशाल, तिची आग आणि धग याला लोक आता कंटाळतील असा टोला त्यांनी लगावला. (Ashish Shelar)
(हेही वाचा – Mumbai Property Tax : मुंबई मेट्रो रेल्वे कंत्राटदारांकडे मालमत्ता कराची ३२६ कोटींची थकबाकी, पण इतर थकबाकीदारांकडे दुर्लक्ष)
उद्धव ठाकरे खोटे बोलत आहेत
उद्धवजी असत्य बोलले आहेत. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद त्यांना देण्याबबात चर्चा झाल्याचा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही. अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्याबाबत अमितभाई कधी म्हणाले नाहीत. अडीच वर्षांचा मुद्दा देवेंद्रजीही कधी म्हणाले नाहीत. साधा नियम आहे की, त्या खोलीमध्ये जर दोनच व्यक्ती असतील तर त्यांच्या म्हणण्यानुसार यामध्ये दोनच व्यक्ती बोलू शकतात. उद्धवजी म्हणतात ते अमित शाह म्हणत नाहीत कारण उद्धवजी खोटे बोलत आहेत, तरी वादापुरते खरे मानले तरी.. अशा परिस्थितीमध्ये मी वकिल असल्यामुळे युक्तीवाद करतो, जर दोन व्यक्ती आपआपल्या वाक्यावर ठाम असतील तर अशा परिस्थितीमध्ये परिस्थितीजन्य पुरावा, समर्थनार्थ आहे का तो पाहिला जातो, असा कुठलाही पुरावा उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही. ते प्रचारात असताना नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच सरकार बनेल, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे जाहीर केले गेले होते, त्या सभांना स्वत: उद्धव ठाकरे उपस्थित होते, आणि त्याला कुठेही आक्षेप घेतलेला दिसून येत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेच खोटे बोलत असून स्वत:चे खोटे पचवण्याचा हा प्रयत्न आहे, असेही आमदार ॲड. आशिष शेलार म्हणाले. (Ashish Shelar)
महाराष्ट्रात घरात आलेल्या सुनेला मुलगी मानले जाते
सुसंस्कृत महाराष्ट्रात घरात आलेल्या सुनेला मुलगी मानले जाते, तिच्या रूपाने लक्ष्मी घरात आली हा आदर केला जातो, मुली एवढंच प्रेम तिच्यावर केलं जातं. आपल्या वक्तव्याने पवार साहेबांनी तमाम मराठी आणि महाराष्ट्र संस्कृतीवर प्रेम करणार्या समस्त मतदारांचं मन दुखावलं आहे. (Ashish Shelar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community