बोगसगिरी करणाऱ्या नगरसेवकांकडून महापालिका 40 लाख वसूल करणार का?

12 नगरसेवकांनी 39 लाख 95 हजार 833 रुपये अदा केले नाहीत.

148

नगरसेवक पद रद्द ठरल्यानंतर 12 नगरसेवकांकडून वेतन व भत्ता पायी अदा केलेले 39 लाख 95 हजार 833 रुपये वसूल करण्यासाठी पत्रव्यवहार केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस महापालिका चिटणीस खात्याने दिली आहे. यात भाजपाचे 3, शिवसेनेचे 3, काँग्रेसचे 3, राष्ट्रवादी काँग्रेसचे 1 आणि अपक्ष 2 नगरसेवक आहेत.

12 नगरसेवकांनी 39 लाख 95 हजार 833 रुपये अदा केले नाहीत!

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिका चिटणीस खात्याकडे माहिती मागितली होती की, ज्या नगरसेवकांचे पद रद्द झाले त्यांच्याकडून वेतन व भत्ता पायी अदा केलेली रक्कम वसूल करण्यात आली आहे. माहिती अधिकार अंतर्गत दिलेल्या माहितीत चिटणीस खात्याने 24 नगरसेवकांची यादी दिली, ज्यांचे पद विविध कारणांसाठी रद्द झाले आहेत. यात 12 नगरसेवकांनी 39 लाख 95 हजार 833 रुपये अदा केले नाहीत. तर 9 नगरसेवकांनी तत्काळ रक्कम अदा केली आहे. 3 असे नगरसेवक आहेत जे ज्यांस निर्रह ठरल्यानंतर कोणतीही रक्कम अदा करण्यात आली नाही.

(हेही वाचा : आघाडी सरकारची इयत्ता कंची? आशिष शेलारांची टीका)

भाजपा, शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येक 3 नगरसेवक आघाडीवर!

थकबाकी न देण्यामध्ये भाजपा, शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येक 3 नगरसेवक आघाडीवर आहेत यात भाजपाचे मुरजी पटेल 5.64 लाख रुपये, केशरबेन पटेल 5.64 लाख रुपये आणि भावना जोबनपुत्रा 3.49 लाख रुपये अदा करत नाहीत. काँग्रेसचे राजपती यादव 5.64 लाख रुपये, किणी मॉरेश 4.84 लाख रुपये आणि भारती धोंगडे 1.81 लाख रुपये अदा करण्यास तयार नाही. शिवसेनेचे सगुण नाईक 3.55 लाख रुपये, अनुषा कोडम 37 हजार आणि सुनील चव्हाण 93 हजार रुपये अदा करत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाजीया सोफी 7.21 लाख रुपये अदा करत नाहीत. अपक्ष असलेले चंगेझ मुलतानी 79 हजार रुपये आणि अंजुम असलम 45 हजार रुपये अदा करत नाहीत. अनिल गलगली यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून मागणी केली आहे की जे नगरसेवक रक्कम अदा करत नाहीत त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून पैसे वसूल होतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.