Chandrakant Patil : राज्यात ४५ जागा नक्की जिंकणार, चंद्रकांत पाटील यांचा दावा

सी व्होटरने २०१९ ला भाजप युतीला १६ जागा दाखवल्या होत्या आणि ४१ मिळाल्या असे सांगत २०२४ च्या लोकसभेला ४५ जागा मिळणार असा दावा चंद्रकांत पाटलांनी केला.

206
Assembly Session : यंत्रमागधारकांना वीज अनुदानासाठी नोंदणीची अट रद्द

राजकारणात नेहमी अनेक गोष्टी वन फाईन मॉर्निंग घडतात, अजित पवारांचा शपथविधी माहित होता का कोणाला? अजून राजकारण तापायाचे आहे, पण आजच सांगतो राज्यात ४५ जागा येतील आणि विरोधकांना ३ जागा मिळतील, असा दावा राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. (Chandrakant Patil)

पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) अनेक योजनांचा लाभ घेणारा सायलेंट व्होटर नावाचा मोठा वर्ग असून तो जातपात, धर्म यांच्यावर आहे. तुम्ही काहीही भाषणे करा तो व्होटर म्हणजे मोदी भक्त असून हा सर्व लाभार्थी कायम मोदींच्या मागे राहतो. हे २०१९ ला दिसून आले आणि अगदी आत्ताच्या तीन राज्याच्या विजयानेही दाखवून दिले, असे सायलेंट व्होटर कोणत्याही सर्व्हेत दिसत नाही आणि त्यामुळे सी व्होटर सर्व्हेचे अंदाज कधीच बरोबर येणार नाहीत, असा टोला लगावला. याच सी व्होटरने २०१९ ला भाजप युतीला १६ जागा दाखवल्या होत्या आणि ४१ मिळाल्या असे सांगत २०२४ च्या लोकसभेला ४५ जागा मिळणार असा दावा चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) केला. (Chandrakant Patil)

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : २२ जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी?)

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या २० जानेवारीच्या आंदोलनावर बोलताना प्रत्येकाला आंदोलन करण्याचा हक्क आहे. मात्र सरकार या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. एवढ्या मोठ्या समाजाचा अभ्यास करायला मागास आयोगाला किमान एक वर्षाचा वेळ लागेल. मात्र पूर्वीचा अभ्यास असल्याने आणि नवीन समिती वेगाने काम करीत असल्याने लवकरच अहवाल येईल, असे त्यांनी सांगितले. हा अहवाल आल्यावर मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) विशेष अधिवेशन बोलावणार असून अशी एखादी तारीख पकडून होणार नाही. गडबड केल्यास ते दिलेले आरक्षण टिकणार नाही, असा सल्ला जरांगे (Manoj Jarange Patil) यांना दिला. जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्याशी चार्चा करण्यासाठी गिरीश महाजन, संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर अशी सरकार मधील मंडळी असून ते चर्चा करीत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. (Chandrakant Patil)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.