राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर Donald Trump भारत दौरा करणार?

134

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सोमवार, 20 जानेवारीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. पदाभार स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात ट्रम्प यांची त्यांच्या सल्लागारांशी चर्चा सुरू असून लवकरच भट देण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चीनलाही भेट देणार असल्याचे म्हटले जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारत दौर्‍याबाबत सल्लागारांशी चर्चा केली असल्याचे रिपोर्ट्समधून समोर आले आहे. ही भेट एप्रिलच्या सुरुवातीला किंवा वर्षाच्या शेवटी होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हाइट हाऊसमध्ये चर्चेसाठी आमंत्रित करण्याच्या विचारावरही ट्रम्प कार्य करत असल्याचे संकेत मिळाले आहेत. दोन्ही देशांमधील आर्थिक आणि राजनैतिक संबंध बळकट करण्याच्या उद्देशाने हा दौरा आयोजित केला जाऊ शकतो.

(हेही वाचा मौनी अमावस्येला MahaKumbh मध्ये ८ ते १० कोटी भाविक येण्याची अपेक्षा)

ट्रम्प (Donald Trump) यांनी चीनवर जास्तीचे शुल्क लादणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे अमेरिका आणि चीनचे संबंध ताणले गेले होते. मात्र, ट्रम्प आता चीन-अमेरिका संबंध सुधारण्यावर लक्ष केंद्रीत करु इच्छित आहेत आणि यासाठी त्यांनी चीन दौर्‍याचा विचारही सुरू केला आहे. भारत आणि चीन दौऱ्याच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आंतरराष्ट्रीय संबंध अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दिसत आहे. विशेषतः व्यापार, संरक्षण आणि जागतिक स्थिरतेसाठी या दौऱ्यांना महत्त्व दिले जात आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.