विधानसभा निवडणुकीत Fake Narrative चालणार का? देवेंद्र फडवणीस म्हणाले… 

लोकसभेच्या निवडणुकीत व्होट जिहाद हा महत्त्वाचा घटक होता. सगळी धार्मिक स्थळे आणि धर्मगुरु व्होट जिहादचा नारा देत होते. आता याचा फायदा होणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

35

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी Fake Narrative चालवून भाजपाला चांगलेच जेरीस आणले होते. निवडणूक संपता संपतादेखील भाजपाला त्या Fake Narrativeचा प्रतिवाद करता आला नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच भाजपा Fake Narrative बाबत सतर्क  बनला आहे. या निवडणुकीत Fake Narrative चालणार का, यावर देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका मांडली. एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

(हेही वाचा Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस केवळ आमचे राजकीय शत्रू ; संजय राऊतांच्या विधानाने चर्चांना उधाण)

काय म्हणाले फडवणीस? 

हरियाणाच्या निवडणुकीत सगळे पोल भाजपाचा दारुण पराभव होणार, असे सांगत होते. पण भाजपाला प्रचंड बहुमत मिळाले. त्यामुळे सकाळी टीव्हीसमोर बोलणारे दुपारी काय बोलू या संभ्रमात पडले होते. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला काही प्रमाणात यश मिळवता आले. Fake Narrative च्या भरवशावर त्यांनी यश मिळवले. आमच्यात फक्त पॉईंट ३ पर्सेंटचा फरक होता. Fake Narrative आम्ही उघडा पाडला. लोकांच्या लक्षात आले की ते खोटे बोलत होते. राहुल गांधींनी आरक्षण कसे संपवणार याचा फॉर्म्युला सांगितला. नाना पटोले त्यांचीच रि ओढत आहेत. तसेच लोकसभेच्या निवडणुकीत व्होट जिहाद हा महत्त्वाचा घटक होता. सगळी धार्मिक स्थळे आणि धर्मगुरु व्होट जिहादचा नारा देत होते. आता याचा फायदा होणार नाही. तसेच व्होट जिहादमुळे बहुसंख्य समाजाच्या लक्षात आले की मोदी नकोत म्हणून व्होट जिहाद करणार असेल तर मतपेटीतून उत्तर देता येईल. त्यामुळे Fake Narrativeआता चालणार नाही, असे देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.