मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या (26/11) दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आलेय. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पंतप्रधानांचे आभार मानलेत. तसेच एनआयएचा तपास आणि कायदेशीर प्रक्रियांमध्ये राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
(हेही वाचा – राज्यात लवकरच नवीन सर्किट ट्रेन सुरू होणार, मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची घोषणा; काय असणार खास? वाचा… )
मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, मुंबई हल्ल्याचा आरोपी आणि कट रचणाऱ्या तहव्वुर राणाला भारतात आणण्यात आल्याने मला खूप आनंद झाला आहे. भारतीय न्यायव्यवस्थेला सामोरे जाण्यासाठी कट रचणाऱ्याला भारतात आणल्याबद्दल मुंबईकरांच्या वतीने मी पंतप्रधानांचे आभार मानतो. कसाबला कायद्यानुसार फाशी देण्यात आली, पण कट रचणारा आमच्या ताब्यात नव्हता. ते आमच्यासाठी एक ओझे होते. परंतु, कारस्थानी तहव्वुर राणा आता एनआयएच्या ताब्यात असून ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत. आता एनआयए तपास आणि कायदेशीर प्रक्रियांबाबत निर्णय घेईल. आम्हाला जी काही माहिती हवी असेल ती आम्ही एनआयएकडून घेऊ. जर त्यांना कोणत्याही मदतीची आवश्यकता असेल तर आम्ही मुंबई पोलिसांमार्फत पूर्ण सहकार्य केले जाईल असे मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले.
(हेही वाचा – Crime : संपत्तीच्या वादातून वांद्र्यात एका कुटुंबावर हल्ला; एकाचा मृत्यू, दोन जखमी, चार जणांना अटक)
तसेच मुंबई हल्ल्यांबद्दल दिग्विजय सिंह यांनी 2010 मध्ये केलेल्या टिप्पणीवर मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, मुर्खासारखे बोलणाऱ्यांना आम्ही उत्तर देत नाही. जेव्हा कसाबला फाशी देण्यात आली आणि त्यानंतर डेव्हिड हेडलीचा आपल्या न्यायालयात जबाब नोंदवण्यात आला तेव्हा हे पूर्णपणे स्पष्ट झाले की हे संपूर्ण कट पाकिस्तानमध्ये रचण्यात आला होता. म्हणून इतर कट रचणाऱ्यांना मी उत्तर देऊ इच्छित नाही. आता मुख्य कट रचणारा आपल्या ताब्यात आहे आणि आणखी काही गोष्टी उघडकीस येतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community