राज्याचा मुख्यमंत्री होणार का? Nitin Gadkari काय म्हणाले?

106
जस जसे मतदानाचा दिवस जवळ येऊ लागला आहे, तसे मविआ आणि महायुतीमध्ये आता मुख्यमंत्री पदावरून विविध नावे चर्चेला येऊ लागली आहेत. मविआमधून उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांचे नाव चर्चेला येत आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये सुप्रिया सुळे यांच्या नावाची पडद्यामागून चर्चा सुरु आहे. अशातच महायुतीमध्येही पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरु असताना देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार असे अमित शाह यांनीच जाहीर केले आहे, अशातच राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांनी चर्चेतील नावांशिवाय दुसरी नावेही समोर येऊ शकतात, असे म्हटले आहे. यावरून नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी, ते मुख्यमंत्री होतील का, यावर उत्तर दिले.

काय म्हणाले नितीन गडकरी? 

मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार नाही, तसेच मला व्हायचेही नाही. जरी कोणी मला मुख्यमंत्रीी केले तरीही मी होणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत गडकरींनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही असे सांगितले आहे. पक्षाचे वरिष्ठ ठरवतील, असेही त्यांनी उत्तर दिले. उद्धव ठाकरेंना दरवाजे बंद आहेत का या प्रश्नावर गडकरींनी थेट उत्तर देणे टाळले. या निवडणुकीत आमची युती आहे, आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत. आमचा सध्या फोकस यावरच आहे, असे गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले. संघ ही सांस्कृतिक संघटना आहे, संघाच्या काही स्वयंसेवकांना राजकारणाची चांगली जाण आहे. त्यांना वाटेल त्या विचारधारेसाठी ते काम करतात. ज्यांना भाजपाची विचारधारा आवडते ते त्याचे काम करत आहे, असेही गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.