अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) राजकारणात प्रवेश करणार, अशा प्रकारच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून चालू आहेत. माधुरी भाजपकडून (elections) उभी रहाणार, असेही सांगितले जात होते. या सर्व चर्चांना स्वतः माधुरीनेच पूर्णविराम दिला आहे. ‘झी २४ तास’ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने (Shriram Nene) यांनी याविषयी खुलासा केला आहे.
(हेही वाचा – Ayodhya : श्रीराम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनाआधी योगी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय)
”राजकारणात यायचा विचार आहे का ?” या प्रश्नाला उत्तर देतांना माधुरी (madhuri entry in politics) म्हणाली की, ”नाही, अजिबात नाही. ती लोकं प्रत्येक निवडणुकीच्या आधी मला कुठे तरी उभे करतात. पण नाही. कारण मला नाही वाटत”, असे माधुरी दीक्षितने म्हटले आहे.
याविषयी श्रीराम नेने यांनीही उत्तर दिले आहे. श्रीराम नेने (Shriram Nene) म्हणतात, ”शेवटी आपल्या सर्वांनाच न्यूट्रल वाटते. काय आहे ना, कोणीही चांगले काम केले, तर त्यांना सपोर्ट करायला पाहिजे ना. आम्हाला त्याचात शिरायचेच नाही.” माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि श्रीराम नेने निर्मित ‘पंचक’ हा सिनेमा येत्या ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
(हेही वाचा – Ayodhya Shri Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिर बांधकामाचे नेतृत्व करतोय महाराष्ट्र; जाणून घ्या कसे?)
श्रीराम नेने व माधुरी दीक्षित-नेने निर्मित ‘पंचक’ (Panchak) चित्रपट ५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. त्याच्या प्रसिद्धीसाठी जगण्याचे सार उमगवणारे एक सुरेख गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत. (Madhuri Dixit)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community