भाजपा आणि महायुतीला सत्तेपासून रोखण्यासाठी मुस्लिम संघटना यांच्यासोबत आता मुस्लिम पक्षही सरसावले आहेत. त्यातील एक, ‘एमआयएम’, (MIM) या पक्षाकडून महाविकास आघाडीला युतीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून केवळ भाजपा-शिवसेना (शिंदे) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे महायुतीचे सरकार महाराष्ट्रात येऊ नये, यासाठी महाविकास आघाडीशी कोणतीही तडजोड करण्याची तयारी ‘एमआयएम’ने दर्शवली असल्याचे ‘एमआयएम’चे (MIM) माजी खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सांगितले. त्यामुळे केवळ भाजपा (BJP) नेतृत्वाखालील महायुतीला सत्ता मिळू नये म्हणून महाविकास आघाडी ‘एमआयएम’ची मदत घेणार का? असा सवाल केला जात आहे.
‘एमआयएम’ला तोंडघशी पाडले
जलील यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की, ‘एमआयएम’ (MIM) पक्षाने अधिकृत प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) प्रमुख शरद पवार, (Sharad Pawar) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे मराठवाडा नेते अमित देशमुख यांच्याकडे १० सप्टेंबर २०२४ ला दिला आहे. दरम्यान दोन-चार दिवसांपूर्वी पवार आणि पटोले यांनी अशा कोणत्याही प्रस्तावाची माहिती नसल्याचे सांगून ‘एमआयएम’ला तोंडघशी पाडले.
(हेही वाचा – NMMS Exam : ‘एनएमएमएस’ परीक्षा ‘या’ तारखेला होणार)
जबाबदारी तुमची
जलील पुढे म्हणाले, “आम्हाला महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना (शिंदे)-राष्ट्रवादी (अप) यांचे सरकार नको आहे. यासाठी आम्ही कोणतीही तडजोड करायला तयार आहोत. अपेक्षेपेक्षा फार कमी जागांची आमची मागणी असेल. मुस्लिमबहुल मतदार संघात आम्ही मुस्लिम उमेदवार देणार, मविआ मुस्लिम उमेदवार उभा करणार, समाजवादी पक्षाचा मुस्लिम उमेदवार आणि अन्य मुस्लिम उमेदवार यांच्यात लढत होऊन तिथे भाजपा (BJP) किंवा शिवसेना (शिंदे) यांचा उमेदवार निवडून येऊ शकतो. तसे झाल्यास जबाबदारी तुमची असेल आणि मग आमच्याकडे बोट दाखवू नये,” असे जलील यांनी स्पष्ट केले.
प्रस्ताव व्हॉटस् अॅप, ईमेल वर
“आमची ताकद जितकी आहे तितक्याच जागा आम्ही मागणार, अवास्तव मागणी आमच्याकडून होणार नाही,” अशी ग्वाहीदेखील जलील यांनी दिली. इतके करून महाविकास आघाडीकडून काही प्रतिसाद न मिळाल्याने बेचैन झालेल्या जलील यांनी हेदेखील सांगितले की, “आम्ही कोणत्याही कबूतरामार्फत प्रस्ताव पाठवला नाही. नेत्यांना व्हॉटस् अॅप आणि ईमेल वर प्रस्ताव पाठवला आहे. आणि आता तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की व्हॉटस् अॅप आणि ईमेल तुम्ही केव्हा पाहिला तेही कळते,” असे जलील म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community