Milind Narvekar शिवसेनेत येणार का? मुख्यमंत्री म्हणाले…

माझी काही तत्त्वे आहेत. जे बोललो ते सगळे खरे आहे. कधी खोटे बोललो नाही. बोलणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

237
Milind Narvekar शिवसेनेत येणार का? मुख्यमंत्री म्हणाले...

उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अत्यंत जवळचे विश्वासू मानले जाणारे, मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) शिवसेनेत प्रवेश (Shivsena Entry) करणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. तसेच मिलिंद नार्वेकर यांना लोकसभेची ऑफर (Lok Sabha Election Offar 2024) सुद्धा देण्यात आल्याची चर्चा आहे. याच संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता नार्वेकरांबद्दल हसले आणि पुढे निघून गेले. (Milind Narvekar)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : सांगलीत होणार तिहेरी लढत; विशाल पाटील यांची निवडणुकीतून माघार नाहीच

दरम्यान, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी जे बोललो ते सगळे खरे आहे. आणखी बरेच खरे आहे. ते खूप काही आहे ते नंतर “ब्रेक के बाद” (Breck ke Baad) येईल. एखादा कार्यकर्ता एवढा मोठा निर्णय घेतो, त्यामागे काही कारणे असतात. जे आहे ते आहे. मी कधी खोटे बोललो नाही. बोलणार नाही. माझी काही तत्त्वे आहेत. बाळासाहेबांच्या विचारांची प्रेरणा आणि दिघे साहेबांच्या शिकवणीत तयार झालो आहे. जिथे अन्याय तिथे न्यायासाठी झगडणे हा माझा स्वभाव आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्यांवर सविस्तर आणि स्पष्ट शब्दांत भाष्य केले.(Milind Narvekar)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : सूरतमध्ये निकालाआधीच झाला भाजपाचा पहिला खासदार ; काँग्रेस म्हणते ‘ही’ मॅच फिक्सिंग)

पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे, परंपरा आहे. सध्या आरोप केले जात आहेत. महिलांवर अशा प्रकारे कधीच टीका झालेली नव्हती. आता ते होत आहे. या सर्व गोष्टींना जनताच मतपेटीतून उत्तर देईल. त्यांना कामधंदा नाही. कामे आम्ही करत आहोत आरोप ते करत आहेत, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. (Milind Narvekar)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.