मागील काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीत मनसे महायुतीत सहभागी होणार का, यावर चर्चा सुरु झाली आहे. याला सुरुवात राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दिल्ली दौऱ्यापासून सुरु झाली आहे. तिथे त्यांची भाजपाचे नेते अमित शाह यांच्यासोबत चर्चा झाली. मात्र या सर्व चर्चांमध्ये नक्की काय घडले, याबाबत ना भाजपाने सुस्पष्टता आणली ना मनसेने आणली. अखेर आता शिवतीर्थावर मनसेचा होणाऱ्या गुढी पाडवा मेळाव्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) मनसेची महायुतीमध्ये सहभागी होणार का, यावर भूमिका स्पष्ट करतील, अशी शक्यता आहे.
९ तारखेला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय… हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे ! #मनसे_पाडवामेळावा #MNSGudhiPadwaRally pic.twitter.com/OgImzXTSQX
— Raj Thackeray (@RajThackeray) April 5, 2024
मनसेच्या गुढी पाडव्याच्या मेळाव्याचा टीझरही रिलीज झाला आहे. त्यामध्ये राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मनसैनिकांना साद घातली आहे. मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचे आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी गुढी पाडव्याच्या सभेत नेमके काय घडत आहे? सर्व सांगणार असल्याचे टिझर रिलीज करत जाहीर केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन गुढी पाडव्याच्या मेळाव्याचा टिझर रिलीज केला आहे. 9 एप्रिल रोजी शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडते आहे… हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचे आहे!, अशा कॅप्शनसह राज ठाकरेंनी गुढी पाडवा मेळाव्याचा टिझर रिलीज केला आहे.
(हेही वाचा Loksabha Election 2024: निवडणूक आयोगाने घेतला लोकसभा निवडणुकीचा आढावा, नोंदवली निरीक्षणे; जाणून घ्या…)
2006 चा विक्रम मोडण्याचा प्रयत्न
मार्च 2006 मध्ये झालेल्या गुढी पाडवा मेळाव्याला झालेला गर्दीचा विक्रम मोडावा. शिवाजी पार्क पूर्णपणे भरण्यासोबतच राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा प्रयत्न आहे की मनसे सैनिकांचा एवढा मोठा जनसमुदाय आला पाहिजे की शिवसेना भवनापर्यंत गर्दी दिसली पाहिजे. मनसेच्या गुढी पाडव्याच्या मेळाव्यात विक्रमी गर्दी जमली, तर काही न बोलता भाजप आणि महायुतीत सहभागी असलेल्या पक्षांना बरंच काही सांगण्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यशस्वी होतील. त्यामुळेच ते गुढी पाडव्यापर्यंत गूढ मौन पाळत आहेत, असे म्हटले जात आहे.
Join Our WhatsApp Community