भाजपाचे तरुण नेते मोहित कंबोज यांनी पुन्हा एकदा ट्विट करुन सर्वांना थक्क केलं आहे. आजपर्यंत त्यांनी ज्यांची ज्यांची नावे घेतली ते सगळे जेलमध्ये गेलेले आहेत. नवाब मलिक, अनिल देशमुख आणि सदा बडबडे नेते संजय राऊत हे सगळे आत गेले आहेत. यांच्या जेलमध्ये जाण्याची भविष्यवाणी महान ज्योतिर्भास्कर मोहित कंबोज यांनी केली होती. आता कंबोज यांना भविष्य पाहता येतं का, हे पाहावं लागणार आहे.
( हेही वाचा : संतोष बांगर : नेत्यांनी कायदा हातात घेणे अपेक्षित नाही)
…त्यामुळे आव्हाड कंबोज यांच्या यादीत नाहीत
परंतु त्यांचा स्ट्राईक रेट उत्तम आहे. आता त्यांनी ट्विट करुन सांगितलं आहे की राष्ट्रवादीचा एक मोठा नेता आत जाणार आहे. या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. आता हा नेता कोण असा प्रश्न लोकांना पडला आहे. सोशल मिडियावर फेरफटका मारल्यावर असं लक्षात येतं की लोकांची इच्छा आहे की जितेंद्र आव्हाड आतमध्ये जावेत. परंतु जितेंद्र आव्हाड हे अतिशय लहान आणि अतिशय सामान्य नेते आहेत. शरद पवारांनी त्यांच्या डोक्यावरचा हात काढला तर त्यांचं राजकीय अस्तित्व संपुष्टात येईल. त्यामुळे आव्हाड कंबोज यांच्या यादीत नाहीत.
आता दोन नावे समोर येतात. एक प्रफुल्ल पटेल आणि दुसरे अजित पवार. आता दोघांवर कारवाई होणार असल्याचं चित्र दिसत आहे. दोघेही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोठे नेते आहेत. एक तर थेट पवार आहे. पण मला असं वाटतं की सध्या अजित पवार सुरक्षित राहतील. कारण राजकारणात सगळेच विरोधत संपले तर काही काळाने जनतेला तुम्ही विरोधक आहात असं वाटू लागेल.
कंबोज यांची भविष्यवाणी कितपत खरी ठरेल याची प्रतीक्षा करावी लागणार
म्हणून लोकशाहीच्या राजकारणात विरोधकांना फारसा त्रास द्यायचा नसतो. त्यांचं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवायचं असतं. जनतेला कुणाचं तरी समर्थन करायचं असतं, तसं कुणाला तरी विरोध करायचा असतो. त्यामुळे सगळेच मोठे विरोधक आत गेले तर राजकीय अस्थिरता निर्माण होईल. म्हणून मला असं वाटतं की थेट पवार कुटुंबाला हात घालण्याऐवजी प्रफुल्ल पटेल, जे शरद पवारांचे खास मानले जातात, ते आत जातील.
आता मोहित कंबोज यांची भविष्यवाणी कितपत खरी ठरेल याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. हिंदुस्थानी भाईच्या भाषेत सांगायचं तर, रुको जरा… सबर करो…
Join Our WhatsApp Community