राणेंची जन आशीर्वाद यात्रा रद्द होणार का?

नारायण राणे हे वकिलांशी चर्चा करत आहेत. अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांना स्वाधीन व्हायचे कि यात्रा सुरु ठेवायची याबाबत ते  भूमिका ठरवत आहेत. 

150

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या वेळी महाड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य केले. त्याविरोधात नाशिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनीही राणे यांच्या अटकेसाठी तयारी सुरु केली असून त्यांचे पथक चिपळूणला रवाना झाले आहे. त्यामुळे राणेंना अटक केली तर त्यांची जन आशीर्वाद यात्रा रद्द होऊ शकते, अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, जन आशीर्वाद यात्रा थांबणार नाही. घटनेने सर्वांना विचारस्वातंत्र्य दिले आहे. सकाळी ११ वाजता राणे न्यायालयात दाद मागतील, त्यांना न्याय मिळेल, मात्र ही सरकारची दडपशाही आहे, असेही पाटील म्हणाले.

हि कारवाई सोयीप्रमाणे – अतुल भातखळकर

राज्य सरकारची ही दडपशाही आहे. त्यांनी सत्तेचा गैरफायदा घेत कारवाई केली आहे. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातही अपशब्द वापरण्यात आले होते. खुद्द शरद पवार ह्यांनी अश्लील हातवारे करून वक्तव्य केली होती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बाप काढला होता, तेव्हा आम्ही कायद्याचा वापर केला नव्हता, असे भाजपचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले.

(हेही वाचा : राणेंच्या विरोधात मुंबईत तणाव! शिवसैनिक- राणे समर्थक भिडणार?)

मुंबईत तणावाचे वातावरण!

दरम्यान नारायण राणेंच्या संभाव्य अटकेच्या कारवाईमुळे मुंबईतही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दादर येथे शिवसेनेने बॅनरबाजी करून राणेंचा निषेध करणे सुरु केले आहे. त्यावर राणे यांचा ‘कोंबडी चोर’ म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांनी लागलीच हे बॅनर उतरवले आहेत. मात्र राणे यांच्या जुहू येथील बंगल्यावर शिवसेनेच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनीही कडक पोलिस बंदोबस्त केला आहे. विशेष म्हणजे हे आंदोलन युवा सेना करणार आहे.

चिपळूणमध्येही तणावाचे वातावरण

जन आशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा हा कोकणापासून सुरु झाली असून मंगळवारी, २४ ऑगस्ट रोजी राणे यांची चिपळूण येथे होणार आहे. त्यासाठी ते रिंग्स रिसॉर्ट येथे थांबले आहेत. मात्र त्या ठिकाणीही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंधुदुर्गातून राणे समर्थकही चिपळूण येथे धडकले आहेत. स्वतः राणे यांचे पुत्र नितेश राणे हेदेखील चिपळूणला रवाना झाले आहेत. त्यामुळे राणे यांची यात्रा होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याआधी राणे हे वकिलांशी चर्चा करत आहेत. नारायण राणे हे वकिलांशी चर्चा करत आहेत. अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांना स्वाधीन व्हायचे कि यात्रा सुरु ठेवायची याबाबत ते  भूमिका ठरवत आहेत.

(हेही वाचा : केंद्रीय मंत्री असलेल्या राणेंना अटक होऊ शकते का? काय म्हणतो कायदा?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.