पुढील ५ वर्षांसाठी एक ग्रॅमही दुधाची भुकटी आयात करणार नाही; Amit Shah यांचे आश्वासन

204
पुढील ५ वर्षांसाठी एक ग्रॅमही दुधाची भुकटी आयात करणार नाही; Amit Shah यांचे आश्वासन

पुढील पाच वर्षांसाठी एक ग्रॅमही दुधाची भुकटी आयात करणार नाही असे आश्वासन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी दिले. ते भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाच्या समारोपाच्या वेळी बोलत होते. यामुळे विरोधकांच्या फेक नरेटिव्हला चांगलीच चपराक बसली असून, पुन्हा एकदा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका दूध उत्पादकांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले. सध्या राज्यात दुधाच्या दरावरून विरोधकांनी राजकारण तापवले आहे. शेतकऱ्यांमध्ये फेक नरेटिव्हच्या संभ्रम निर्माण करून सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र आखले होते. पण केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या आश्वासनाने त्याला सुरुंग लावला आहे. (Amit Shah)

मंत्री विखे पाटील यांनी नुकताच दुधाला शासकीय अनुदानासह दुधाला सरसकट ३५ रुपये भाव जाहीर केला आहे. दुध भुकटीच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी १० हजार मॅट्रिक टन भुकटीवर ३० रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर दुधाला हमी भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला असून त्याला केंद्र सरकारने सकारात्मता दाखवली आहे. यामुळे त्याबाबतही लवकरच कायदा केला जाईल असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. (Amit Shah)

(हेही वाचा – ITR Filing 2024 : व्हॉट्सॲपवरून कसं भरायचं आर्थिक विवरणपत्र याचा संपूर्ण लेखाजोखा)

केंद्र सरकारने दूध भुकटी आयतीचा निर्णय रद्द करावा यासाठी मंत्री विखे पाटील यांनी केंद्राला पाठपुरावा केला होता. आणि या संदर्भात वारंवार खुलासा करून दिशाभूल न करण्याचे आवाहन केले होते. पण विरोधकांनी याचे राजकारण करून दूध प्रक्रिया प्रकल्पामध्ये सुद्धा फेक नरेटिव्हचे राजकारण करण्यास सुरुवात केली होती. पण केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या आश्वासनाने दूध उत्पादक शेतकरी आणि दूध प्रक्रिया केंद्राना मोठा दिलासा मिळणार आहे. असे मत मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केले. (Amit Shah)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.