Pankaja Munde यांचं राजकीय पुनर्वसन होणार? देवेंद्र फडणवीस यांनी नाव सुचवल्याची माहिती

239
Pankaja Munde यांचं राजकीय पुनर्वसन होणार? देवेंद्र फडणवीस यांनी नाव सुचवल्याची माहिती
Pankaja Munde यांचं राजकीय पुनर्वसन होणार? देवेंद्र फडणवीस यांनी नाव सुचवल्याची माहिती

भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा लोकसभेत पराभव झाला. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित होऊ लागला आहे. पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा सध्या राजकारणात रंगू लागल्या आहेत. तसेच प्रस्ताव देखील महाराष्ट्र भाजपाने केंद्रीय नेतृत्वाला पाठवल्याचं माहिती मिळाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांची राज्यसभेवर वर्णी लागणार का? याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे. (Pankaja Munde)

 माहिती सूत्रांनी . दिल्लीत झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बीडमधून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी ६ हजारांहून अधिक मताधिक्यांनी त्यांचा पराभव केला होता. या पराभवामुळे भाजपाला मोठा धक्का बसला. पंकजा मुंडे यांचे समर्थक देखील त्यांच्या पराभवामुळे निराश झाले. काहींनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल देखील उचललं. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचं राजकीय पुनर्वसन करा, अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांकडून वारंवार केली जात आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आता नवी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात सध्या आरक्षणासाठी ओबीसी विरुद्ध मराठा (OBC vs Maratha) असा संघर्ष सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यामुळे मराठा समाज हा आगामी निवडणुकीत भाजपापासून दूर जाण्याची शक्यता आहे. यामुळे आता भाजपाकडून ओबीसी नेत्यांना जवळ घेतलं जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. (Pankaja Munde)

(हेही वाचा – Accident: नागपूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ३ वाहनांचा अपघात, २० हून अधिक प्रवासी जखमी)

पंकजा मुंडे या ओबीसीच्या (OBC Morcha) आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे त्यांना राज्यसभेवर संधी दिली तर आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपाच्या केंद्रीय नेत्यांना केली आहे. यापूर्वी देखील दोनवेळा पंकजा मुंडे यांचं नाव विधानपरिषदेवर नेमण्याचा प्रस्ताव प्रदेश भाजपाने पाठवला होता. आता त्यांचं नाव थेट राज्यसभेवर पाठवण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यसभेची खासदारकी देऊन पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन केलं जाईल का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. (Pankaja Munde)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.