वीर सावरकर यांचा अवमान केल्याप्रकरणी Rahul Gandhi न्यायालयात हजर राहणार की त्यांच्याविरोधात अटक वॉरंट निघणार?

न्यायालयाने राहुल गांधी यांना २ डिसेंबर २०२४ ला न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचा आदेश दिला होता. मात्र राहुल गांधी संसदेचे अधिवेशन असल्याचे कारण देत न्यायालयात हजर राहिले नव्हते,

65

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून त्यांची बदनामी, अवमान केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना २ डिसेंबर २०२४ ला पुण्यातील विशेष न्यायालयाने प्रत्यक्ष हजर राहण्याचा आदेश दिला होता. पुण्यातील खासदार/आमदार यांच्यासाठी असलेल्या विशेष न्यायालयाने हा महत्त्वाचा आदेश दिला होता. मात्र राहुल गांधी या दिवशी न्यायालयात हजर राहिलेच नाहीत. त्यावेळी त्यांनी आपल्याला संसदेच्या अधिवेशनात हजर राहावे लागत असल्याचे कारण न्यायालयाला दिले होते. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १० जानेवारीला होणार आहे. या दिवशी तरी राहुल गांधी (Rahul Gandhi) न्यायालयात हजर राहणार का, यावर आता चर्चा सुरु झाली आहे. जर राहुल गांधी यावेळीही अनुपस्थित राहिले, तर त्यांच्या विरोधात न्यायालय अटक वॉरंट काढू शकते.

गेल्यावर्षी एप्रिलमध्ये, वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर (Veer Savarkar) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 5 मार्च 2023 रोजी लंडनमध्ये वीर सावरकरांबद्दल बदनामीकारक टिप्पणी केल्याबद्दल पुण्यातील दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली. 21 सप्टेंबर 2024 रोजी हे प्रकरण खासदार/आमदारांच्या न्यायालयात वर्ग करण्यात आले. खासदार/आमदार न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांनी 4 ऑक्टोबर 2024 रोजी राहुल यांना समन्स बजावले होते की, “भारतीय दंड संहितेच्या कलम 500 नुसार शिक्षेस पात्र असलेल्या गुन्ह्याच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी तुमची उपस्थिती आवश्यक आहे म्हणून 23 ऑक्टोबर 2024 रोजी मॅजिस्ट्रेटसमोर वैयक्तिकरीत्या हजर रहावे असे न्यायालयाने म्हटले होते. पण समन्स न पोहोचल्याने गांधी हजर झाले नाहीत. यानंतर न्यायालयाने पुन्हा समन्स जारी करून राहुल गांधींना १८ नोव्हेंबरला हजर राहण्यास सांगितले. हे समन्स त्यांना पोस्टाने बजावण्यात आले होते आणि ते त्यांना प्राप्त झाले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना २ डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते, त्या दिवशी राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) हे संसदेच्या अधिवेशनाच्या कामात सहभागी होता यावे म्हणून न्यायालयात हजर राहू शकत नाही, असे कारण दिले होते.

(हेही वाचा इस्लामी राजवटीला विरोध करणाऱ्यांना संपवणार; Khilafah Conference च्या पोस्टमध्ये चिथावणीखोर भाषा)

आता या प्रकरणाची सुनावणी १० जानेवारीला होणार आहे. या दिवशीही राहुल गांधी (Rahul Gandhi) न्यायालयात हजर राहिले नाही तर न्यायालय राहुल गांधी यांना भादंवि १७४ अंतर्गत फरार घोषित करून त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करू शकते. तसे झाले तर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांना राहुल गांधी यांना पकडून न्यायालयात हजर करावे लागणार आहे. असे करणाऱ्या आरोपीची नंतर मालमत्ताही जप्त होत असते. तसेच राहुल गांधी यांच्या विरोधात त्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणीही वेगळी याचिका दाखल होईल, ज्यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान न्यायालयाने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना २ डिसेंबर २०२४ ला न्यायालयाने प्रत्यक्ष हजर राहण्याचा आदेश दिला होता. मात्र राहुल गांधी यांनी संसदेचे अधिवेशन असल्याचे कारण देत न्यायालयात हजर राहिले नव्हते, परंतु त्याचवेळी हेच राहुल गांधी अधिवेशनाच्या कालखंडात २० डिसेंबरला उत्तर प्रदेशातील संभल येथे जाऊन आले, जिथे जातीय दंगल झाली होती, तिथे जाऊन राहुल गांधी यांनी राजकरण केले, मात्र न्यायालयात येण्याचे त्यांनी टाळले. त्यामुळे याचिकाकर्ते सात्यकी सावरकर यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणू देत राहुल गांधी यांनी न्यायालयाचा अवमान केला असल्याचे न्यायालयाला कळवले आहे. त्यामुळे जर १० जानेवारीला राहुल गांधी न्यायालयात हजर राहिले तर त्यांना याविषयीचा खुलासा न्यायालयात करावा लागणार आहे.

काय आहे प्रकरण?

सात्यकी सावरकर (Veer Savarkar) यांनी केलेल्या तक्रारीनुसार राहुल गांधी यांनी लंडनमध्ये सांगितले होते की, विनायक दामोदर सावरकरांनी एक पुस्तक लिहिले, ज्यात त्यांनी असे म्हटले होते की, ते (सावरकर) आणि त्यांचे पाच किंवा सहा मित्र एका मुस्लिमाला मारहाण होत असल्याचे पाहत असताना आनंदीत झालो. त्यानंतर राहुल गांधींनी म्हटले की, हे भ्याड कृत्य नाही का… पण सावरकरांनी राहुल गांधींनी (Rahul Gandhi) दावा केल्याप्रमाणे असे कोणतेही पुस्तक लिहिलेले नाही किंवा अशी घटनाही घडलेली नाही, हे सात्यकी सावरकर यांनी पुराव्यासहित न्यायालयात मांडले आहे.

सात्यकी सावरकर यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे की, “राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वीर सावरकर यांच्यावर हेतुपुरस्सर खोटे आणि बिनबुडाचे आरोप केले आहेत. हे आरोप असत्य आहेत हे पूर्णपणे जाणूनही त्यांनी सावरकर (Veer Savarkar) आडनावाची बदनामी करण्याच्या विशिष्ट हेतूने प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याच्या दृष्टीने आरोप केले. या याचिकेत त्यांनी पुरावा म्हणून काही बातम्यांचे अहवाल तसेच राहुल गांधींच्या लंडनमधील भाषणाच्या व्हिडिओची YouTube लिंक सादर केली होती. सात्यकी यांनी आरोपींना आयपीसी कलम ५०० अंतर्गत जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली आहे.

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.