Raj Thackeray किंगमेकर ठरणार? मनसेला किती जागा मिळणार ? काय आहे एक्झिट पोल्सचा अंदाज?

211
Raj Thackeray किंगमेकर ठरणार? मनसेला किती जागा मिळणार ? काय आहे एक्झिट पोल्सचा अंदाज?
Raj Thackeray किंगमेकर ठरणार? मनसेला किती जागा मिळणार ? काय आहे एक्झिट पोल्सचा अंदाज?

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) २० नोव्हें. रोजी मतदान पार पडले. मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे (Exit polls) अंदाज समोर आले आहेत. एक्झिट पोल्सने महायुतीला (Mahayuti) जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवला असला तरी काही एक्झिट पोल्सनुसार महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीमध्ये काँटे की टक्कर आणि अपक्ष आणि इतर पक्षाच्या हाती सत्तेची सूत्र जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. (Raj Thackeray)

(हेही वाचा-Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा…”, एक्झिट पोलच्या अंदाजांवर Devendra Fadnavis काय म्हणाले ?)

दरम्यान, राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेला (MNS) किती जागा मिळणार याचेही आकडे एका एक्झिट पोलमधून समोर आले आहेत. एका एक्झिट पोलमध्ये मुख्य पक्षांबरोबरच मनसे आणि वंचितला किती जागा मिळणार हे सांगितले आहे. हा एक्झिट पोल दैनिक भास्करने केला आहे. या पोलमध्ये त्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेला दोन ते तीन जागांचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे यावेळची मनसेची स्थिती थोडी सुधारलेली दिसेल. भास्करच्या एक्झिट पोल नुसार महाविकास आघाडीला 135-150 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली आहे. तर महायुतीला 125-140 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ELECTORAL EDGE च्या एक्झिट पोलनूसार कोणाला किती जागा मिळणार?
भाजप- 78
काँग्रेस- 60
एनसीपी-एसपी- 46
शिवसेना-उबाठा- 44
शिवसेना- 26
एनसीपी-अजित पवार- 14
मनसे, वंचित, एमआयएम अपक्ष इतर- 20

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.