उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी भारतीय जनता पार्टीबत गद्दारी केली आहे. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वैचारिक फरक असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांना जागा मिळतील की नाही, हे लवकरच कळेल. असे म्हणत आशिष शेलार यांनी राज ठाकरे हे लवकरच महायुतीचा प्रचार करतील, अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे आशिष शेलार म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवणे ही आमची सर्वात मोठी चूक होती, त्यांनी आमचा विश्वासघात केला, लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करताना कोणत्या पक्षाचा उमेदवार कोणत्या जागेवर विजय होऊ शकतो, याचा विचार करूनच निर्णय घेतला जात असल्याची माहिती शेलार यांनी दिली. कोणती जागा कोणत्या पक्षाची, यापेक्षा कोण कोणत्या जागेवर निवडून येऊ शकतो, हे पाहून उमेदवारी दिली जाईल, असे देखील शेलार यांनी म्हटले. ज्या ठिकाणी भाजपा निवडून येऊ शकतो, त्या ठिकाणी भाजपाचा उमेदवार असेल तर जिथे शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो, त्या ठिकाणी शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असेल, असा दावा देखील आशिष शेलार यांनी केला.
राष्ट्रवादीने भाजपासोबत येण्याची तयारी दाखवलेली
ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे आमच्या विरुद्ध उभे आहेत ते पाहता त्यांच्या परतीचे दरवाजे बंद केले. 2016-17 मध्येच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत येण्याची तयारी दाखवली होती. मात्र, त्यावेळी त्यांना शिवसेना सोबत नको होती. मात्र, आम्ही ते मान्य केले नाही. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली असती तर आज परिस्थिती वेगळी असती, असे मतही आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Community