मुंबई मनपात सत्ता आल्यास भाजपचा महापौर, आरपीआयचा पहिला उपमहापौर – रामदास आठवले

103
केशवानंद भारती

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-आरपीआय-शिवसेना महायुतीचा विजय निश्चित आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता आल्यास भाजपचा महापौर आणि आरपीआयचा उपमहापौर होईल. ५ वर्षांत पहिली अडीच वर्षे टर्म उपमहापौर आरपीआयचा आणि दुसरा टर्म उपमहापौर शिवसेना शिंदे गटाचा होईल, असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. आगामी मुंबई मनपा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्या उमेदवारांना आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी निवडून आणायचे असून भाजप शिवसेनेने आरपीआयच्या उमेदवारांना ही निवडुन आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आठवले यांनी केले.

भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी ५ वर्षांत पहिला उपमहापौर आरपीआयचाच होईल असे आश्वासन दिले. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे मित्र धर्म पाळणारे आदर्श नेते आहेत, असे सांगत आशिष शेलार यांनी आठवले यांच्यावर कविता करीत सभेत रंगत आणली.

२०१९च्या निवडणुकीत मतदान केलेल्या झोपडीधारकांच्या झोपड्यांना अधिकृत मान्यता देण्यात यावी. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत ५०० फूटांचे घर देण्यात यावे. तसेच खासगी इमारतींना काल मर्यादा गुणवत्ता यासाठी रेरा प्राधिकरण आहे. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ही गुणवत्ता आणि इमारती बांधण्यासाठी निश्चित कालमर्यादा पाळणासाठी रेरा सारखे प्राधिकरण असावे, मुंबईत बंजारा भवन; कक्कया भवन बांधावे अशा विविध मागण्यांचे ठराव करण्यात आले.

यावेळी मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, अध्यक्ष स्थानी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, माजी मंत्री अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

(हेही वाचा – शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.