विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, सरकार स्थापन झाले, मंत्रिमंडळ पूर्ण झाले आता राज्यातील महापालिका, नगरपालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत, अशातच संदीप नाईक (Sandeep Naik) यांच्या घरवापसीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संदीप नाईक यांनी भाजपाला रामराम करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. आता त्यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीत वडील गणेश नाईक भाजपामध्ये तर मुलगा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असे चित्र पाहायला मिळाले होते. बेलापूरमधल्या जोरदार लढाईत भाजपाच्या मंदा म्हात्रेंनी संदीप नाईकांचा (Sandeep Naik) पराभव केला. निसटत्या मतांनी मंदा म्हात्रे विजयी झाल्या. राज्यात महायुतीला भरघोस यश मिळाले असून नवे सरकार स्थापन झाले. आता तुतारी हाती घेतलेल्या संदीप नाईकांना मात्र घरवापसीचे वेध लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.
(हेही वाचा मोदी सरकारच्या CAA कायद्यामुळे ५३ वर्षांनंतर १० बांगलादेशी हिंदूंना मिळाले भारतीय नागरिकत्व)
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री गणेश नाईकांना याबाबत विचारल्यावर, आमच्या कुटुंबात निर्णय स्वतंत्रता असते असे सांगून त्यांनी यातला सस्पेन्स वाढवला. भाजपच्या मंदा म्हात्रेंनी संदीप नाईकांचा पराभव करून पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. आता संदीप नाईकांना घरवापसीचे वेध लागले आहेत. गणेश नाईकांना मंत्रीपद आणि संदीप नाईकांची (Sandeep Naik) घरवापसी झाल्यास नवी मुंबईत नाईकांची ताकद वाढणार आहे.
Join Our WhatsApp Community